आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा पोलिस दलातील सीसीटिएनएस विभागातील पोलिस कर्मचारी नीलेश ठाकूर यांना सीसीटीएनएस प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी देशपातळीवरील विशेष पुरस्कार देऊन शुक्रवारी दिल्ली येथे गौरवण्यात आले. महाराष्ट्रातून केवळ दोन कर्मचारी व एका अधिकाऱ्याला हा पुरस्कार मिळाला असून त्यामध्ये नीलेश यांचा समावेश आहे. केंद्र शासनाच्या ई गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत नॅशनल क्राइम ब्युरो ऑफ रेकॉर्डसच्या माध्यमातून सीसीटीएनएस ही प्रणाली राबवली जाते.
एससीआरबी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबवला जातो. यात गुन्ह्याबाबत सर्व माहिती ऑनलाइन स्वरुपात भरली जाते. जिल्ह्यात २८ ठाण्यांत ही यंत्रणा कार्यरत असून समन्वय ठेवण्यासाठी अधीक्षक कार्यालयात सीसीटीएनएस कक्ष कार्यरत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.