आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:बर्दापुरात कृषी विभागातर्फे कीड नियंत्रणाबाबत जागृती

बर्दापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत विविध योजनांची माहिती देण्यात आली. मंडळ कृषी अधिकारी ठाकूर व कृषी सहायक शेख यांच्या वतीने माहिती देण्यासह कामगंध सापळे शेतकऱ्यांना वितरित केले. सोयाबीन व इतर पिकांवरील कीड नियंत्रणासाठी कृ़षी विभागाच्या वतीने जागृती करण्यात येत आहे. याप्रसंगी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन आपन ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले.

यासह कृषि यांत्रिकीसाठी ट्रॅक्टरसह आवश्यक औजारे जसे की नांगर, मोगडा, पाळी, पेरणीयंत्र व गायगोठा, कांदा चाळ, तुषार सिंचन व ठिबक सिंचन यासाठी ऑनलाईन अर्ज करावेत. तसेच शेतकऱ्यासाठी फळ प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी लागणारे कर्ज हे बँकेच्या माध्यमातून घेऊन तो प्रक्रिया उद्योग उभारुन झाल्यास त्यासाठी दहा लाख रुपयापर्यंत सबसिडी देण्यात येणार असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...