आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती:गणेशोत्सवानिमित्त धारूर शहरात जनजागृतीपर रॅली

धारूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जय किसान गणेश मंडळाच्या वतीने सामजिक लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता.४ सप्टेंबर) सकाळी सामाजिक सलोखा देखावा व जनजागरण रॅली काढण्यात आली. यात महापुरुष देखावा, धारूर दर्शन तसेच पथ नाट्याच्या माध्यमातून मतदान ओळखपत्र व आधार लिंक याबाबत जनजागृती करण्यात आली.

येथील जय किसान गनेश मंडळाच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी ११ वाजता जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत लहान मुलांपासून वयोवृद्धांचा समावेश होता रॅलीत विविध सामाजिक देखावे दाखवण्यात आले. किल्लेधारूर दर्शन, महापुरुष, वारकरी दिंडी, छत्रपती शिवाजी महाराज देखावा तसेच सामाजिक ऐक्य निर्माण व्हावे अशा पद्धतीने विविध देखावे दाखवण्यात आले होते. या रॅलीत शहराच्या मुख्य ठिकाणी पथ नाट्याच्या माध्यमातून मतदार जनजागृती व मतदार कार्ड, आधार कार्ड जोडणीचे पथ नाट्य सादर करण्यात आले. व्यापारी बालाभाऊ जाधव, अनिल चिद्रवार, पत्रकार अनिल महाजन, अतुल शिनगारे, सादिक इनामदार, अॅड.मोहन भोसले यांच्या प्रमुख उपस्थिती छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅलीची सांगता झाली.

बातम्या आणखी आहेत...