आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील ५७ वर्षांपासून ऑर्थोपेडिक (हाडांचे आजार) संबंधी पुणे येथून संपूर्ण महाराष्ट्रासह अन्य राज्य व देशांमधील रुग्णांवर उपचार करून बरे करणाऱ्या संचेती हाॅस्पिटलमध्ये बाेन बँक हा नवीन प्रकल्प सुरू हाेणार आहे. २०२३ या नवीन वर्षातील फेब्रुवारी महिन्यात प्रत्यक्षात ही बाेन बँक कार्यान्वित हाेईल. या बँकेतून लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत तसेच दिव्यांग रुग्णांनाही लाभ हाेईल. ही बाेन बँक राज्यातील दुसरी बँक असणार आहे.
मागील अनेक वर्षांपासून हाॅस्पिटलद्वारे गरीब आणि गरजूंना लाभ देण्यासाठी नियमितपणे अनेक मोफत वैद्यकीय शिबिरे आणि इतर सामाजिक उपक्रम राबवले जातात. यामधून ठळकपणे जाणवणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे व रुग्णांना आजारातून बरे करण्यासाठी बाेन बँक हा प्रकल्प सुरू केला जात आहे. सध्या महाराष्ट्रात टाटा मेमाेरिअरल हाॅस्पिटल येथे बाेन बँक आहे. ती सरासरी १९८६ ते ९० च्या दरम्यान सुरू झाली आहे. संचेती इन्स्टिट्यूट फॉर ऑर्थोपेडिक अँड रिहॅबिलिटेशनचे स्थापना १९६५ मध्ये करण्यात आली, अशी माहिती बीडला एका शिबिरासाठी आलेले संचेती हाॅस्पिटलचे मुख्य संचालक डाॅ. पराग संचेती, बाेन बँकप्रमुख डाॅ. प्रमाेद भिल्लारे यांनी दैनिक ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली.
देशात पाच ठिकाणी मृत्यूनंतर बाेन दानची व्यवस्था : जिवंतपणी रक्तदान केले जाते त्याच प्रकारे अनेकांकडून मृत्यूनंतर इतर रुग्णांना जीवदान मिळावे म्हणून विविध अवयव दान केले जातात. त्याचप्रमाणे मृत्यूनंतर शरीरामधील बाेन (हाडे) दान करता येतात. देशात सरासरी पाचपेक्षा अधिक सुपर मल्टिस्पेशालिस्ट हाॅस्पिटलमध्ये मृत्यूनंतर बाेन दान करून घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. आता पुण्यात देखील होईल. अशा प्रकारची सेवादेखील संचेती हाॅस्पिटलमध्ये पुढील वर्षात सुरू करण्याचा मानसही बाेन बँकेचे प्रमुख डाॅ. प्रमाेद भिल्लारे यांनी बोलून दाखवला आहे.
फेब्रुवारी २०२३ पासून प्रकल्प होणार सुरू काेण-काेण बाेन देण्यासाठी पात्र? या बाेन बँकेसाठी बाेन दान करावयाचे असल्यास संबंधित रुग्णांची प्रथमत: संमती घेतली जाते. प्राधान्याने ज्या रुग्णांचा खुबा बदलणे, गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया केली जाते तशा प्रकारचे बाेन हे बाेन बँकेमध्ये विविध प्रकारच्या प्रक्रिया व तपासण्या करून जतन करण्यासाठी ठेवण्याची व्यवस्था केली जाते. केवळ याच प्रकारचे रुग्ण बाेन देण्यास पात्र ठरतात.
आशियातील सिंगल स्पेशालिटी हॉस्पिटल ^ऑर्थोपेडिक्स आणि प्रगत शस्त्रक्रियांसाठी आशिया खंडामध्ये एकमेव स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून संचेती हाॅस्पिटलची आेळख निर्माण झाली आहे. भारतातील पहिले पूर्णपणे स्वदेशी गुडघा इम्प्लांट केले जाते तसेच देशभरातील सांधेदुखीच्या रुग्णांना परवडणाऱ्या किमतीत वेदनामुक्त करण्याचा आमचा मानस असताे. - डाॅ. पराग संचेती, मुख्य संचालक, संचेती हाॅस्पिटल, पुणे
बाेन बँकसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नक्की यशस्वी होईल ^संचेती हाॅस्पिटलच्या रुग्णसेवेची परंपरा जुनी आहे. त्यामुळे हाडांच्या संबंधी बाेन बँक करण्याचा आमच्या हाॅस्पिटलचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. याद्वारे उपचाराधीन रुग्णासह आजारी रुग्णासही बाेन बँकेचा लाभ कमी दरामध्ये हाेणार आहे. फेब्रुवारी २०२३ पासून हा महत्वाचा प्रकल्प कार्यान्वित हाेईल. - डाॅ. प्रमाेद भिल्लारे, बाेन बँकप्रमुख, संचेती हाॅस्पिटल
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.