आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅरेथॉन:बीडला प्रथमच बालाघाट हाफ हिल मॅरेथॉन

बीड23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील योगा ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय बालाघाट हाफ हिल मॅरेथॉन आज पार पडणार आहे पालवण जिल्हा परिषद शाळपासून काही अंतरावर असलेल्या मोकळ्या जागेत मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे.

५ किलोमीटरसाठी ६८५ स्पर्धेक, १० किलोमीटरसाठी ३७५ स्पर्धक तर २१ किलोमीटरसाठी १३० स्पर्धक असे एकूण बाराशे स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. २१ किलोमीटरसाठी मॅरेथॉन स्थळापासून कदमवाडी ते पुन्हा परत मॅरेथॉन स्थळ असा मार्ग राहणार आहे.

१० किलोमीटरसाठी मॅरेथॉन स्थळापासून ते पिंपळवाडी शाळेजवळचा पुल ते पुन्हा परत मॅरेथॉन स्थळ आणि ५ किलोमीटरसाठी मॅरेथॉन स्थळापासून देव राईचा घाट ते पुन्हा परत मॅरेथॉन स्थळ असा मार्ग राहणार आहे. आरोग्य विषयक सुरक्षा म्हणून मॅरेथॉन स्थळ ते धावण्याच्या मार्गावर तीन टप्यात ५ रुग्णवाहिका व वैद्यकीय टीम उपलब्ध राहणार आहे. यामध्ये एक कार्डियाक रुग्णवाहिकेचा सहभाग आहे.

धावपटूंसाठी ८ वॉटर स्टेशनची निर्मिती केली आहे. या ठिकाणी पाणी व एनर्जी ड्रिंक धावपटूंना दिले जाणार आहे. पिंपळवाडी व परिसरातील वाड्यांतील शेतकरी, भाजीपाला विक्रेते, दुध विक्रेते रोज सकाळी सहा वाजता बीडला येतात त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून केवळ सकाळी ६ ते ११ या वेळेत पिंपळवाडी, भाळवणी, वरवटी ते पालवण चौक या मार्गाची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. यात धावपटूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहेे.

बातम्या आणखी आहेत...