आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलभीम महाविद्यालय:उच्च शिक्षणातील जिल्ह्याचे मागासलेपण बलभीम महाविद्यालयाने दूर केले

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्यानंतर मराठवाड्यात फक्त मोजक्याच ठिकाणी उच्च शिक्षणाची सोय असल्यामुळे बीड जिल्हा उच्च शिक्षणात मागासलेला होता. परंतु, सन १९६० मध्ये मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी औरंगाबाद, बीड व परभणी या ठिकाणी महाविद्यालये स्थापन करून या जिल्ह्यांचे शैक्षणिक मागासलेपण दूर केले. यात बीड येथील बलभीम महाविद्यालयाने अनेक पिढ्या घडवत मोलाचे योगदान दिले, असे प्रतिपादन उपप्राचार्य तथा लेखक डॉ. गणेश मोहिते यांनी केले.

बीड येथे बलभीम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील कला व वाणिज्य शाखांच्या वतीने सोमवारी (ता.२९ ऑगस्ट) प्राचार्य डॉ. वसंत सानप यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रा. डॉ. मोहिते हे बोलत होते. मंचावर उपप्राचार्य डाॅ.संतोष उंदरे, माजी विद्यार्थी अॅड. अजित देशमुख, प्राचार्य देशमुख, डाॅ. राधाकिसन परजणे, गोपाल कासट, जाधव, ज्ञानदेव काशिद यांची उपस्थिती होती. अॅड.अजित देशमुख म्हणाले की, बलभीम महाविद्यालय विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानदानाबरोबरच संस्कार व सेवाभाव रूजवण्याचे महत्वाचे कार्य करत आहे.

आम्हालाही या महाविद्यालयाने घडविण्याचे काम केले. महाविद्यालयाचे विद्यार्थी आज विविध क्षेत्रात धडाडीने काम करत आहेत. या सर्वांमागे येथील प्राध्यापकांनी तन्मयतेने घडवलेले शिक्षण व संस्कार आहेत, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी प्राचार्य देशमुख यांनी ग्रामीण भागात शैक्षणिक संस्थांचे जाळे नव्हते तोपर्यंत शिक्षणाची ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठी पायपीट करावी लागायची आहे. मात्र, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी शहरात शाळा, महाविद्यालये सुरु करण्याऐवजी ग्रामीण भागाला प्राधान्य दिले ही महत्वाची बाब आहे.

माजी विद्यार्थ्यांनीही आपल्या ज्ञानातून बीड जिल्ह्याचे नावलौकिक केलेेले आहे. विविध कलावंत, साहित्यिक, लेखक या महाविद्यालयाने घडवल्याने ही मोठी उपलब्धी आहे, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी माजी विद्यार्थी , जाधव, ज्ञानदेव काशिद यांनीही आपल्या मनोगतांतून महाविद्यालयाविषयी आपले ऋणानुबंध व्यक्त केले. उपप्राचार्य डाॅ.संतोष उंदरे म्हणाले की, माजी विद्यार्थी हे आमची ऊर्जा असून विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात जेंव्हा नावलौकिक मिळवतात तेंव्हा ही बाब महाविद्यालयासाठी गौरवाची असते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख डाॅ. रवींद्र काळे यांनी केले. सूत्रसंचालन मराठी विभागाचे प्रा. संदीप परदेशी यांनी केले तर आभार वाणिज्य विभागप्रमुख डाॅ. ईश्वर छानवाल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिंदी विभागप्रमुख प्रा. डाॅ. बाबासाहेब कोकाटे, इंग्रजी विभागप्रमुख प्रो. डाॅ. बालाजी नवले, इतिहास विभागप्रमुख डॉ. बापू जाधवर, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुरेश घुमटकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी गेल्या सहा दशकातील माजी विद्यार्थी या कार्यक्रमासाठी प्रातिनिधिक स्वरूपात हजर होते.

शिक्षणातूनच जिल्हा आज विकासाच्या दिशेने
उसतोड कामगारांचा जिल्हा असणाऱ्या बीड जिल्ह्याने आता शिक्षणातून परिवर्तनाची वाट चोखाळली आहे. बीड येथील अनेक विद्यार्थी कला, शिक्षण, संगीत, साहित्य, क्रीडा अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कार्याने बीड जिल्ह्याची ओळख निर्माण केली आहे. हे केवळ शिक्षण सुविधांमुळेच होऊ शकले, असे प्रतिपादन माजी विद्यार्थी तथा व्याख्याते ज्ञानदेव काशिद यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...