आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबलभीम महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तर मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.मनोहर सिरसाट यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मराठी अभ्यास मंडळावर पहिल्या पसंतीच्या सर्वाधिक मतांनी विजय मिळविला आहे.
डॉ.मनोहर सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सात विद्यार्थ्यांनी पीएच.डी.प्राप्त केली आहे.त्यासोबतच त्यांचे पाच ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. साहित्य,संशोधन आणि सामाजिक क्षेत्रात आजपर्यंत त्यांचे उल्लेखनीय काम राहिले आहे.त्याबद्दल त्यांना विविध संस्था आणि संघटनांकडून सात आदर्श शिक्षक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
मराठी अभ्यास मंडळावर विक्रमी मतांनी निवडून आल्याबद्दल त्यांचे मशिप्र मंडळाचे अध्यक्ष आ.प्रकाश सोळंके,सरचिटणीस आ.सतीश चव्हाण, उपाध्यक्ष आणि बलभीम महाविद्यालयाचे प्रमुख आ.अमरसिंह पंडित, प्राचार्य डॉ.वसंत सानप, उपप्राचार्य डॉ.संतोष उंदरे, उपप्राचार्य डॉ.गणेश मोहिते, प्रबंधक पी.पी.डावकर, अधीक्षक किसन सागडे, महाविद्यालयातील मराठी विभाग आणि सर्व सहकारी प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.