आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागरण गोंधळात हलगी वाजवून उरनिर्वाह करणारा बीडचा बाळू धुताडमल याची किन्नर असलेल्या सपनाशी मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. अडीच वर्षांपासून ते ‘लिव्ह इन इन रिलेशनशिप’मध्ये राहत आहेत. या दोघांनी आता पुढील आयुष्यात एकमेकांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. ६ मार्च रोजी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ते विवाहबद्ध होणार आहेत.
गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील रहिवासी असलेला बाळू धुताडमल हा तरुण जागरण गोंधळात हलगी वाजवून आपल्या उदरनिर्वाह भागवत आहे. बाळूची ओळख बीड शहरातील किन्नर सपनाशी झाली होती. त्यांनतर त्यांच्या वारंवार भेटी होऊ लागल्या. भेटीतून दोघात मैत्री झाली. अडीच वर्षांपासून हे दोघे एकत्रित राहतात. आता ते लग्न करणार आहेत.
या विवाहासाठी मदत करावी
अडीच वर्षांपासून एकत्र राहत राहणारे बाळू व सपना यांनी मैत्रीचे प्रेमरूपी नाते टिकवून ठेवले आहे. यापुढेही दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. आम्ही या विवाहासाठी पुढाकार घेतला असून समाजातील दानशूरांनीही त्यांना मदत करावी. -आयशा शेख, उपाध्यक्षा ,महाराष्ट्र पत्रकार संघ मुंबई शाखा, बीड
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.