आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किर्तन सोहळा:सांप्रदायिक भजनाच्या चालीची बंकटस्वामींनी देणगी दिली

नेकनूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वारकरी संप्रदायातील भक्तिसूर्य बंकटस्वामी महाराज यांनी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला सांप्रदायिक भजनाच्या चालीची अमोल देणगी दिली, असे प्रतिपादन सतीश महाराज उरणकर यांनी केले.

नेकनूर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाचे कीर्तनपुष्प गुंफताना बोलत होते या वेळी नाना महाराज कदम, सुरेश महाराज जाधव, वसंत महाराज शिंदे, भास्कर महाराज शिंदे दिनेशशास्त्री महाराज, अच्युत महाराज घोडके यांच्यासह शेकडो भाविक भक्तांची उपस्थिती होती.

सतीश महाराज उरणकार यांनी संत तुकाराम महाराज यांच्या धनी न पुरे गुण गाता ! रूप दृष्टी न्याहालीता।। या अभंगावर चिंतन मांडले. यावेळी बोलताना महाराज म्हणाले, भगवान परमात्म्याचे गुण गाताना आणि दृष्टीने न्याहाळीताणा धनी पुरत नाही तसेच पांडुरंग हा बरवा आहे त्याची कांती सावळे सुरुंग आहे सर्वमंगला चे सार भगवान परमात्मा आहे तर त्याचे मुख्य सिद्धीचे भांडार आहे त्याची भजन भक्ती केली असता नामस्मरण केले असता त्याचा रूप न्याहाळत असता गुणगान गायला असता सुखाला अंत पार राहत नाही संत बंकटस्वामी महाराज यांची महाराष्ट्राला खूप मोठी देणगी आहे त्याच्यामुळेच आज गावखेड्यातील परमार्थ टिकून आहे असेदेखील सतीश महाराज म्हणाले. या वेळी साथ-संगत बंकट स्वामी महाराज फडावरील सर्व टाळकरी गायक वादक मंडळींची लाभली.

बातम्या आणखी आहेत...