आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:आरोग्याबाबत सजग राहा; आजाराचे निदान होऊन उपचार मिळाल्यास बरे होऊ शकतो, डॉ.नंदकिशोर पानसेंचे प्रतिपादन

माजलगाव6 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

माजलगाव येथे रोटरी क्लब ऑफ माजलगाव सेंट्रलच्या वतीने गुरुकृपा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज येथे आयोजित केलेल्या कर्करोग जनजागृती अभियानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब माजलगाव सेंट्रलचे अध्यक्ष गजेंद्र खोत हे होते. व्यासपीठावर विजया दुलांगे, रोटरी क्लब सेंट्रलचे आण्णासाहेब तौर, हनुमान कासट, प्रभाकर शेटे, पांडुरंग चांडक, नीलकंठ साबळे, विनोद जाधव, सुनील शिंदे, इम्रान नाईक, काटकर, कुलकर्णी, पत्रकार सुरक्षा संघाचे बाळासाहेब अडागळे, पत्रकार ज्योतिराम पांढरपोटे, प्राचार्य डॉ.किरणकुमार, प्रा.डॉ.साबीर शेख, प्रा,डॉ.अतुल बिर्ला, कृष्णा रासवे, गायत्री सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना डॉ.पानसे म्हणाले आपल्याकडे उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादी सारखे सर्वसामान्य वाटणारे आजार लवकर बरे होत नाहीत. या आजाराचे उपचार आयुष्यभर करावे लागतात. परंतु कॅन्सर हा आजार नावाप्रमाणे गंभीर वाटत असला तरी योग्यवेळी योग्य उपचार मिळाले तर कॅन्सर हा आजार १०० टक्के बरा होऊन रुग्ण सामान्यपणे आयुष्य जगू शकतो. म्हणून कॅन्सर निदानासाठी गावागावात थेट संपर्क असलेल्या आशाताईंची भूमिका महत्वाची आहे. त्यासाठी सर्व आशा वर्कर्सना अशा प्रशिक्षण वर्गातून कॅन्सर निदान व त्यासंबंधी उपचारांची माहिती दिली तर कॅन्सर या आजाराचे त्वरित निदान होऊन हा आजार प्रथम अवस्थेतच आटोक्यात आणण्यात मदत होईल. यासोबत व्यक्तीगत पातळीवर महिलांनीही आपल्या आरोग्याची काळजी घेत जर कर्करोगाची प्राथमिक लक्षणे, गाठ कुठेही जाणवल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी. कारण योग्य वेळी निदान झाल्यास उपचार अधिक चांगल्या पध्दतीने घेणे शक्य होते.

पुरुषांनीही तंबाखू, गुटखा असे कर्करोगास कारणीभूत असलेले व्यसन सोडावीत, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना गरुकृपा सेवाभावी संस्थेच्या डॉ.प्रियंका राजेभोसले यांनी आरोग्य शिबिरांची उपयुक्तात पटवून सांगितले. यासह प्रत्येकाने आपल्या आरोग्याबाबत सजग राहावे, असे आवाहन केले. सूत्रसंचालन अशोक वाडेकर यांनी केले. परमेश्वर शिंदे यांनी आभार व्यक्त केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रत्येक शनिवारी मोफत कर्करोग तपासणी शिबिर कर्करुग्णांना तपासणीसाठी व पुढील उपचारासाठी बार्शी किंवा औरंगाबाद, पुणे, मुंबई येथे जावे लागत होते. परंतु आता त्यासाठीच्या केमो व औषधी खर्च वगळता सर्व आवश्यक सुविधा गुरुकृपा सेवाभावी संस्थेच्या मालिपारगाव येथील फार्मसी कॉलेजमध्ये दर शनिवारी तज्ज्ञ डॉक्टरांसह मोफत देण्यात येणार आहेत.

कर्करोग हा पूर्ण बरा होणारा आजार असून त्याबद्दलची भीती दूर करून कर्करोगाला प्रतिबंध घालण्याची आवश्यकता आहे. आराेग्याबाबत आपण सजग राहिले पाहिजे. काहीही त्रास वाटला तर वेळीच तपासणी करुन घ्यावी. जेणेकरून योग्य वेळी निदान होऊन योग्य उपचारांनी आपण बरे होऊ शकतो, असे प्रतिपादन बार्शी येथील नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर रिसर्च सेंटरचे विभागीय समन्वयक डॉ.नंदकिशोर पानसे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...