आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या तालमीतील मल्लाला पूर्वाश्रमीच्या आपल्याच तालमीतील मल्लाने पराभूत केल्याच्या रागातून आष्टीत बेदम मारहाण करुन चाकू हल्ला करण्यात आला. या प्रकरणी एकूण २० जणांविरोधात आष्टी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपींमध्ये महाराष्ट्र केसरी विजेता मल्ल सईद चाऊसचा मुख्य आरोपी म्हणून समावेश आहे.
मनोज रामदास पवार (२२, रा. कारखेल बुद्रुक ता. आष्टी) असे मारहाण झालेल्या मल्लाचे नाव आहे. २३ नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला. मनोज हा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा विजेता मल्ल सईद चाऊस याच्या तालमीत काही दिवस जात होता मात्र काही दिवसांपूर्वी त्याने तालीम सोडली होती. दरम्यान काही कुस्ती स्पर्धांमध्ये त्याने सईदच्या तालमीत प्रशिक्षण घेणाऱ्या मल्लांचा पराभव केला होता. २३ नोव्हेंबर रोजी मनोज हा भगवान कॉलेज परिसरातून दुचाकीवरून जात असताना सईद चाऊस आणि त्याच्या तालमीतील इतर मल्लांनी मनोजची दुचाकी अडवून तू पूर्वी आमच्या तालमीत येत होतास, आता का येत नाही, आमच्या पैलवानांना का पाडताेस असे म्हणून बेदम मारहाण केली. त्याच्यावर चाकू हल्ला करुन खिशातील १० हजार काढून घेतले.
मारहाणीत एक जण जखमी या प्रकरणी महाराष्ट्र केसरी सईद अलीबान चाऊस, त्याचा भाऊ फहाद अलीबान चाऊस (रा. आष्टी) यांच्यासह मुयरध्वज राजाभाऊ कणसे रा. तपोवन, अमोल दिगंबर दिंडे (रा. मंगरुळ), इरफान सलीम सय्यद, विश्वास बाळासाहेब तावरे (रा. खानापूर), प्रविण हनुमान झगडे (रा. सोलावाडी), शाशना मतीन शेख (रा. आष्टी), ओंकार अजिनाथ आंधळे (रा. माणिकदौंडी), सागर हनुमान पोकळे (रा. मातकुळी) व इतर ८ ते १० जणांविरोधात गुन्हा नोंद झाला. यात एक जण जखमी झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.