आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:मारहाण, लूटमार करणारा गजाआड

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिक्षाचालकास मारहाण करून लुटणाऱ्या कुख्यात दरोडेखोरास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. ही कारवाई ७ डिसेंबरला अंबाजोगाईत करण्यात आली. किरण राजाराम मस्के (२३, रा. परळी वेस, अंबाजोगाई) असे त्या आरोपीचे नाव आहे. एका रिक्षाचालकास मारहाण करून लुटल्याचा गुन्हा अंबाजोगाई शहरात २०२० मध्ये घडला होता. यात किरण मस्के हा आरोपी होता.

मात्र, शहर पोलिसांना गुंगारा देत तो फिरत होता. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेकडून सध्या पाहिजे, फरार आरोपींची शोधमोहीम सुरू आहे. या मोहिमेत किरण मस्के यास ७ डिसेंबरला पकडून अंबाजोगाई शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार राजू पठाण, विष्णू चव्हाण, बाळासाहेब जायभाये, अर्जुन यादव यांनी ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...