आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:एचआयव्हीसह जगणाऱ्या पाचवीच्या 5 मुलांना वर्गाबाहेर काढले,  इन्फंट इंडिया प्रकल्प संचालकांची तक्रार, मुख्याध्यापकांकडून खंडन

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो प्रतिकात्मक आहे - Divya Marathi
फोटो प्रतिकात्मक आहे
  • एड्ससह जगणाऱ्या मुलांना शिक्षणापासून रोखता येणार नाही
  • पाली ( ता. बीड) येथील जि.प. शाळेत प्रकार : इन्फंट इंडिया प्रकल्प संचालकांची तक्रार, मुख्याध्यापकांकडून खंडन

बीड तालुक्यातील पाली येथील जिल्हा परिषद शाळेत इन्फंट इंडियाच्या आनंदवन प्रकल्पातील एचआयव्हीसह जगणारी इयत्ता पाचवीतील पाच मुले गेली होती. मात्र त्यांना वर्गाबाहेर काढून परत प्रकल्पावर आणून सोडून दिले. त्यांना वर्गात बसू दिले नाही, अशी तक्रार इन्फंटच्या प्रकल्प संचालकांनी बीडचे पालकमंत्री व शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, शाळेत असा कोणताही प्रकार झाला नाही. इन्फंटचे शिक्षकच त्यांना घेऊन गेले असे मुख्याध्यापक व शालेय समितीच्या अध्यक्षांचे म्हणणे आहे.

बीड तालुक्यातील इन्फंट इंडिया प्रकल्पात एचआयव्हीसह जगणारे ६५ विद्यार्थी आहेत. यात पाचवीतील ५, तर सहावी ते दहावी शिकणारे २७ विद्यार्थी आहेत. बुधवारी पालीच्या जि.प. शाळेत या प्रकल्पातील पाचवीचे ५ विद्यार्थी गेले. तासिका सुरू असतानाच काही जणांनी वर्गात येऊन आनंदवन प्रकल्पाचे कोण विद्यार्थी आलेत, अशी विचारणा केली. ‘तुम्ही कशाला या शाळेत आला, तुम्हाला तुमच्या प्रकल्पावर शाळा दिली आहे. तुम्ही त्याच ठिकाणी शिका’ असे म्हणून त्यांनी मुलांना वर्गाबाहेर काढले. ती मुले दुपारी १२ वाजता रिक्षात बसवून त्यांच्या प्रकल्पात पाठवण्यात आली. मुलांनी हा प्रकार सांगितल्यानंतर प्रकल्प संचालक दत्ता बारगजे व संध्या बारगजे यांनी पुन्हा मुलांना शाळेत आणले. मुख्याध्यापक कांतीराम लाड यांच्यासह शिक्षकांची भेट घेऊन चर्चा केली. ‘आमच्या हातात काहीच नाही, आमचा नाइलाज आहे’ असे शिक्षकांनी सांगितले. याप्रकरणी बारगजे यांनी बुधवारी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे व जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांच्याकडे तक्रार केली. ते म्हणाले, ‘आमच्या शाळेत शिक्षक येत नसल्याने त्या बंद आहेत. त्यामुळे मुलांना जि. प. शाळेत बसवण्यात येत आहे. शिक्षण विभागाने गावकऱ्यांचे समुपदेशन करावे.’

मुलांना हाकलले नाही
पाली येथील ६ वी ते १०वी पर्यंतच्या जि. प. शाळेत याच प्रकल्पातील २८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इन्फंट प्रकल्पात पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा आहे. त्या मुलांनी या शाळेत प्रवेश घेतलेला नाही. इन्फंटचे शिक्षक जावेद हेच या मुलांना घेऊन परत प्रकल्पावर गेले. मुलांना आम्ही हाकलले नाही. - कांतीलाल लाड, मुख्याध्यापक
- शहादेव वीर,अध्यक्ष, शिक्षण समिती

एड्ससह जगणाऱ्या मुलांना शिक्षणापासून रोखता येणार नाही
बीड जिल्ह्यातील पाली येथे एड्ससह जगणाऱ्या मुलांना शाळेबाहेर काढण्याचा प्रकार संतापजनक आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून कोणीही रोखू शकत नाही. केंद्र सरकारने कायद्यात तशी तरतूद केली आहे. आमच्या संस्थेतील मुलांवरही असा प्रसंग ओढवला होता. पाली येथे झालेल्या प्रकरणाची चौकशी करून गावकऱ्यांचे समुपदेशन करण्याची गरज आहे. - रवी बापटले, हॅपी इंडिया व्हिलेज प्रमुख, लातूर

बातम्या आणखी आहेत...