आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसरा मेळावा:कोणत्या नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी मी फुले टाकत नव्हते ही मी भगवानदादांसाठी आणि तुमच्यासाठी वाहत होते, भगवान गडावर पंकजा मुडेंचे भाषण

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तुम मुझे कब तक रोकोगे, मुठ्ठी में कुछ सपने लेकर, जेबों में कुछ आशाऐं, दिल में अरमान यहीं, कुछ कर जाये…

आज देशभरात विजयादशमीचा सण संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यामध्येही दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान राजकीय दृष्ट्या देखील आजचा दिवस महत्त्वाचा असतो. दसऱ्याच्या निमित्ताने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवानगडवर आयोजित मेळाव्याला उपस्थिती लावत जनतेला संबोधित केले. हेलिकॉप्टरने पंकजा मुंडे भगवानगडावर दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांनी हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव केल्याचेही पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच राज्य सरकारवरही ताशेरे ओढले आहेत. यासोबतच उपस्थितांचे देखील आभार मानले आहेत.

चमचेगिरी करण्यासाठी फुलं टाकत नव्हते
पंकजा मुंडेंनी भगवानगडवर हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव केला. याविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, कोणत्या नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी मी फुले टाकत नव्हते, तर भगवानदादांसाठी आणि तुमच्यासाठी मी फुले वाहत होते. ही दसऱ्याची जी भक्ती आणि शक्तीची जी परंपरा आहे ती कायम ठेवण्यासाठी घऱची पुरणपोळी सोडून आले तुम्ही आले आहात, आभारी आहे. देशात असा सोहळा कुठे होत नसेल असे देखील मुंडे म्हणाल्या आहेत.

पंकजा मुंडेंनी कविता वाचून दाखवली
पंकजा मुंडे या मेळाव्याला उपस्थिती लावत असताना हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. यानंतर हेलिकॉप्टरचे पुन्हा लँडिंग करण्यात आले होते. यानंतर पुन्हा लँडिंग करण्यात आले. याविषयी बोलताना पंकजा मुंडे खोचक टोला लगावत म्हणाल्या की, मला वाटलं कोणाची दृष्टी लागली मेळाव्याला. मला वाटलं मी येऊ शकणार नाही , पण नंतर मी विचार केला तुम्ही मला कधीपर्यंत रोखणार? असे म्हणत पंकजा मुंडेंनी कविता वाचून दाखवली.

“तुम मुझे कब तक रोकोगे, मुठ्ठी में कुछ सपने लेकर, जेबों में कुछ आशाऐं, दिल में अरमान यहीं, कुछ कर जाये… सुरजसा तेज नहीं मुझमें, दीपकसा जलता देखोगे, तुम मुझे कब तक रोकोगे, अपनी हद रोशन करने से तुम मुझे कैसे टोकोगे, कैसे रोकोगे”

केवळ पॅकेज जाहीर करुन चालणार नाही
राज्यातील शेतकऱ्यांचे या पावसाळ्यात प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारच्या पॅकेज जाहीर करण्याविषयी पंकजा म्हणाल्या की, केवळ पॅकेज जाहीर करुन चालणार नाही. प्रत्येकाच्या हातामध्ये मदत दिली जावी आणि त्यांची दिवाळी गोड करावी. केवळ मोदींचे तेवढे पैसे येत आहेत. मात्र राज्य सरकारचे, पालकमंत्र्यांचे आले आहेत का? असा सवालही त्यांनी केला. तसेच त्यांना असे काही बोलले तर राग येतो. आता तुम्हीच सत्तेत आहात आम्ही तुम्हाला विचारणार ना.. तुम्ही विरोधात बसले होता तर धमक्या दिल्या जात होत्या.' असा टोलाही पंकजा मुंडेंनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

महिला सुरक्षेवरही केले भाष्य
राज्यातील महिला सुरक्षेच्या प्रश्नावरही देखील पंकजा मुंडेंनी बोट ठेवले आहे. त्या म्हणाल्या की, राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालेला दिसत आहे. महिलांवर अत्याचार होताय, बलात्काराच्या घडना घडत आहे. महिलांकडे वाकड्या नजरेने पाहिले तरीही डोळे काढून घेणाऱ्यांची ही भूमी आहे. अशा लोकांना हत्तीच्या पायाखाली दिले गेले पाहिजे. मात्र आपल्या राज्यात काय सुरू आहे? त्यावर बोलायचे नाही, आरोपींवर देखील बोलायचे नाही, सरकारला जाब देखील विचारायचा नाही? असा सवालही त्यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...