आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 तास तपास:बॉम्ब नसल्याचे स्पष्ट होताच जिल्हा कचेरीतील सर्वांचा जीव पडला भांड्यात

बीडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॉम्ब असल्याच्या निनावी फोनमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह पथकाची धांदल उडाली.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी दैनंदिन कामकाज सुरू असताना अचानक दुपारी बाराच्या सुमारास पोलिसांच्या दोन व्हॅन दाखल झाल्या. व्हॅनमधून पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि श्वान पथक कार्यालयात घुसले. हा पोलिसांचा लवाजमा पाहून जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी काय झाले म्हणून विचारत होते, तर पोलिस त्यांना आहे तेथेच बसा हालचाल करू नका...अशा सूचना करत बॉम्बशोधक पथक व दहशतवादीविरोधी पथकातील पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह संपूर्ण परिसर पिंजून काढला. श्वानानेही माग घेण्याचा प्रयत्न केला. तब्बल दोन तास शोध मोहीम राबवल्यानंतर बॉम्ब नसल्याची रिपोर्टिंग पोलिस अधीक्षकांना करून मिशन क्लोज करत कंट्रोल रुमला आलेला तो फोन निनावी असल्याचे स्पष्ट झाले अन् सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत शोधकार्य

दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत जुने जिल्हाधिकारी कार्यालय, नवीन इमारत, नियोजन भवन, तिरंगा झेंडा परिसर, वाहतूक व्यवस्था परिसरासह इतर ठिकाणी शोधकार्य करून बॉम्ब नसल्याचा संदेश एसपींना दिला. आलेला कॉल निनावी असल्याचे स्पष्ट केले. -राजकुमार मोरे, पोलिस उपनिरीक्षक, बॉम्बशोधक व नाशक पथक.

११.४५ वाजता पोलिसांना फोन
एसपी कार्यालयातील कंट्रोल रूमला दुपारी ११.४५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब असल्याचे सांगून फोन कट केला. क्षणाचाही विलंब न करता पोलिस अधीक्षकांनी बॉम्बशोधक व नाशक पथकाला तत्काळ घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले.

बातम्या आणखी आहेत...