आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेकायदेशी काम:ऑनलाइन चक्री जुगारावर बीड शहर पोलिसांचा छापा; आरोपी ताब्यात

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जुनी भाजी मंडईतील एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररीत्या चालवल्या जात असलेल्या ऑनलाइन चक्री जुगार अड्ड्यावर शहर पोलीसांनी छापा मारला. या कारवाईत एका आरोपीस ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्याच्याकडून चक्री जुगाराचे साहित्य व ५ हजार ३४० रुपये, सीपीयु, लॅपटॉप कीबोर्ड व इतर साहित्य जप्त करण्यात आले. सचिन अंबादास काळे (३८,रा.कबाड गल्ली,हमु.भगवानबाबा प्रतिष्ठान,बीड) असे आरोपीचे नाव आहे. जुनी भाजी मंडई येथील पिंगळे गल्लीसमोर ऑनलाईन चक्री सुरू असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर शहर ठाण्याचे प्रमुख रवी सानप यांनी एक पथक पाठवून त्या चक्री जुगार अड्ड्यावर छापा मारला.

बातम्या आणखी आहेत...