आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:बारा तास उलटले तरी कोरनाबाधित गावातच, दिव्य मराठीने पाठपुरावा केल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी पाठवली गाडी

बीड5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचे निदान करण्यासाठी नमुने दिल्यानंतर रात्री साडेदहा वाजता बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील तीन तरुण व दोन वृद्धांना तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आढळले. अशी माहिती आरोग्य विभागाने मोबाईलवरून त्यांना दिली. तुम्ही पुढील उपचारासाठी तयार रहा तुम्हाला घेऊन जाण्यासाठी बीड येथून गाडी येईल असे त्यांना सांगण्यात आले. पण गाडी मात्र आली नाही. रात्रभर पाचही कोरोना बाधित एकाच ठिकाणी बसून राहिले.

बारा तास उलटले तरी तीन तरुण व दोन वृद्ध अशा पाच जणांना आज शनिवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत बीड येथे नेण्यात आले नाही. दरम्यान लिंबागणेश येथे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दिव्य मराठीच्या प्रतिनिधीने हा प्रकार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राधाकृष्ण पवार यांना सांगून पाचही कोरोना बाधितांची नावे व संपर्क क्रमांक कळवले. यानंतर त्यांनी याची नोंद करण्यात येईल व त्यांना लवकरात लवकर उपचार मिळतील असे सांगितले. दरम्यान सध्या पाच ही जण गावातच उपचाराच्या प्रतीक्षेत बसले होते.

फोन गेल्यानंतर रुग्णांसाठी पाठवली गाडी
दिव्य मराठीच्या प्रतिनिधीने या सर्व घडनेचा पाठपुरावा केला. यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राधाकृष्ण पवार यांच्याशी सकाळी संपर्क केल्यानंतर बीड तालुक्यातील लिंबागणेश तीन तरुण व दोन वृद्ध असे पाच नवीन कोरूना बाधितांना बीड येथे घेऊन जाण्यासाठी गाडी पोहोचली. त्यानंतर पाचही कोरोना बाधित बीडला रवाना झाले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser