आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाशी लढा:रुग्णांचा ‘हायपॉक्सिया’ वाढला; प्रशासनाची ‘दमछाक’, रोज हवा 3 कोटी लिटर ‘प्राणवायू’; लिक्विड ऑक्सिजनअभावी जिल्हा रुग्णालयातील प्लँट बंद, प्रशासनाची उडाली धांदल

बीड18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑक्सिजन पुरवठ्याची पाहणी करताना डाॅ. आंधळकर, डाॅ. मंडलेचा.

कोरोनाच्या रुग्णांमध्ये ‘हायपॉक्सिया’चे प्रमाण प्रचंड वाढले अाहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत प्राणवायूची मागणी तिप्पट झाली आहे. रुग्णांसाठी ऑक्सिजन उपलब्ध करताना प्रशासनाची ‘दमछाक’ होत आहे. रविवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयातील लिक्विड ऑक्सिजन संपल्याने प्रशासनाची धांदल उडाली. सोमवारी पहाटेपर्यंत अधिकाऱ्यांनी रुग्णालयात ठाण मांडून अनावश्यक वापर थांबवण्यासाठी गरज नसलेल्या, कमी गरज असलेल्या रुग्णांचा ‘ऑक्सिजन फ्लो’ कमी केला.

जिल्ह्यात कोरोना संक्रमण वेगाने होत असून बाधितांच्या संख्येत रोज हजारांनी भर पडत आहे. मृतांचे आकडेही वाढत असल्याने चिंताजनक स्थिती आहे. यातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांमध्ये वैद्यकीय परिभाषेतील हायपॉक्सिया होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अधिक रुग्णांना ऑक्सिजन लावण्याची वेळ येत आहे. जिल्हा रुग्णालय, लोखंडी सावरगाव रुग्णालय, अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालयांनाही ऑक्सिजनची मोठी गरज आहे. जिल्ह्याला दररोज सुमारे २ कोटी २५ लाख लिटरपेक्षा अधिक म्हणजेच रोज सुमारे साडेतीन हजार जम्बो सिलिंडर ऑक्सिजन गरजेचा आहे. मात्र, जिल्ह्याला होणारा आॅक्सिजन पुरवठा याचे प्रमाण कमी आहे. रविवारी रात्री ऑक्सिजन तुटवड्यानंतर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, डॉ. सचिन आंधळकर, डॉ. पारस मंडलेचा यांनी रुग्णालयाचा पहाटेपर्यंत राउंड घेतला.

१० केएल क्षमतेचे ४ टँक, लिक्विड मिळेना : बीड जिल्हा रुग्णालय, लोखंडी सावरगाव रुग्णालयात प्रत्येकी १, तर अंबाजोगाईच्या स्वारातीत १० केएल क्षमतेचे दोन लिक्विड टँक तयार केलेले आहेत. प्रत्येक टँकरमधून सुमारे १ हजार जम्बो सिलिंडर ऑक्सिजन रोज तयार होऊ शकताे. पुण्याच्या ‘आयनॉक्स’ कंपनीकडून याचा पुरवठा सध्या होतो. कंपनीचीही लिक्विड ऑक्सिजन देताना तारांबळ उडत आहे.

१२८० रुग्ण ऑक्सिजनवर : जिल्ह्यात सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत १ हजार २८० रुग्ण ऑक्सिजनवर होते. यापैकी १०५ रुग्ण एनआयएफवर, तर १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर होते अशी माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाच्या वतीने डॉ. सचिन आंधळकर यांनी दिली.

एक दिवस पुरेल
अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील ही लिक्विड ऑक्सिजन संपला होता. सोमवारी सकाळी ४.२० केएल ऑक्सिजन मिळाला आहे. ताे केवळ एकच दिवस पुरेल. मंगळवारी पुन्हा नव्याने गरज लागणार आहे. डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, स्वाराती, अंबाजोगाई

हायपॉक्सिया म्हणजे काय?
कोरोना रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ९५ टक्क्यांपेक्षा कमी झाली तर या स्थितीला ‘हायपॉक्सिया’ म्हणतात. यात रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होतो. यात रुग्णांना ऑक्सिजन द्यावा लागतो. ज्या रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजन कमी होत असतानाही त्यांना कुठला त्रास होत नाही, जाणवत नाही अशा स्थितीला ‘हॅप्पी हायपॉक्सिया’ म्हणतात.

चार प्लँटमधून ८४ जम्बो सिलिंडर
जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी बीड जिल्हा रुग्णालयात, अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालय आणि लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्लँट उभारण्यात आलेले आहेत. प्रत्येक प्लँटमधून दिवसाकाठी ८४ ते ८७ जम्बो सिलिंडर म्हणजे सुमारे ६ लाख लिटर ऑक्सिजन निर्मिती होते मात्र तो सध्याच्या स्थितीत
दिव्य मराठी विशेष : जिल्ह्यात सध्या दीड हजार रुग्ण आहेत ऑक्सिजनवर

पाठपुरावा सुरू आहे
जिल्हा रुग्णालयाला लिक्विड ऑक्सिजन मिळावा यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यामार्फत पाठपुरावा सुरू आहे. वरिष्ठ स्तरावरूनही ऑक्सिजन मिळावा म्हणून प्रयत्न केले जात आहेत. डॉ. सुखदेव राठोड , अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, बीड


बातम्या आणखी आहेत...