आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड कोरोना:परळीत नागरिकांच्या मोफत थर्मल स्कॅनिंगला सुरुवात; शनिवारी 12 हजार नागरिकांची केली तपासणी

परळीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • थर्मल स्कॅनिंगला सर्वांना सहकार्य करावे, धनंजय मुंडे यांचे परळीकरांना आवाहन

परळी मतदारसंघात पालकमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान व वन रुपी क्लिनिकच्या माध्यमातून शुक्रवार (17 एप्रिल) पासून नागरिकांचे मोफत थर्मल स्कॅनिंग सुरू आहे, शनिवारी दुसऱ्या दिवशी परळी शहरातील 12 हजार नागरिकांची वैद्यकीय तपासणी (थर्मल टेस्टिंग) करण्यात आली.

शनिवारी शहरातील प्रभाग क्रमांक 4 व 15 मध्ये ही तपासणी करण्यात आली असून नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या टेस्टिंग दरम्यान काही नगरिकांमध्ये ताप आढळून आल्याने त्यांना परळी उपजिल्हा रुग्णालयामार्फत कोरोना चाचणी (Swab test) चा सल्ला देण्यात आला आहे. तसेच त्या अनुषंगाने त्यांचे नमुने चाचणीसाठी घेतले जाणार आहेत.

शनिवारी वन रुपी क्लिनिक च्या टीमने शहरातील प्रभाग 4 व 15 अंतर्गत अंबेवेस, झुरळे गोपीनाथ गल्ली, कणव गल्ली, डांगे गल्ली, धोकटे गल्ली, गणेशपार, गोडाळे गल्ली, कासारवाडा, काझीपार, जंगम गल्ली, धनगर गल्ली, देशमुख गल्ली, इस्लामपूरा बंगला, भोई गल्ली, गोपनपाळे गल्ली, ईटके गल्ली, सरकारवाडा, नांदूरवेस, चुकार गल्ली, हनुमान नगर, आयेशा कॉलनी, मुजावर वाडा या भागांमध्ये घरोघरी जाऊन ही थर्मल टेस्टिंग करण्यात आली. 

यासाठी वन रुपी क्लिनिकच्या टीम सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, जाबेर खान पठाण, वैजनाथ सोळके, विनोद जगतकर, अनिल आष्टेकर, गोविंद कुकर, डॉ.आनंद टिंबे, किरण सावजी, चारुदत्त करमाळकर, वैजनाथ जोशी, केशव बडवे, रोहित कुलकर्णी, विनायक भाले, श्रवण चौधरी, कैलास शिंदे, चंद्रप्रकाश हालगे, कैलास साखरे, तक्की खान, अजमद खान, नवाब तहसीन, अमर रोडे, राज जगतकर, राहुल जगतकर, प्रताप समीदंरसावळे, विष्णू साखरे, अनंत देशमुख, प्रशांत देशमुख, बाबा सरवदे, रावसाहेब जगतकर, शुभम देशमुख, लहू हालगे आदींनी नागरिकांशी समन्वय साधत यशस्वी टेस्टिंग करून घेतले.

पक्षभेद विसरुन सर्वस्तरातून धनंजय मुंडेंचे कौतुक

शेतकऱ्यांना अचानक आलेली अडचण लक्षात घेत प्रसंगी शेतकऱ्यांकडील संपूर्ण भाजीपाला विकत घेऊन गरजू नागरिकांना मोफत वाटप करणारे; कोरोनाच्या संकट काळात कोणाचाही पक्ष - धर्म काहीही न बघत संपूर्ण मतदारसंघात सरसकट मोफत थर्मल टेस्टिंग करून घेणारे धनंजय मुंडे यांचे आम्ही त्यांच्या विरोधी पक्षाचे असूनसुद्धा आम्हाला त्यांच्या या संकटकाळात केलेल्या कामगिरीचे कौतुक वाटते अशा प्रतिक्रिया विरोधी पक्षातील काही समर्थक व पदाधिकाऱ्यांनी पक्षभेद विसरून सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...