आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार:कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्पेशल वॉर रूम

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी कार्यालयातच स्पेशल वॉर रूम स्थापन केली आहे

महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारीचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर आणि अत्यावश्यक औषधांचा तुटवडा सगळीकडे भासत आहे. राज्य सरकारने एप्रिल महिन्यापासून 45+ तर 1 मे पासून 18 वर्षांवरील लोकांचे लसीकरण चालू केले आहे. तरीदेखील कोरोनाचे नवीन रुग्ण कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. बीड जिल्ह्यातदेखील सगळ्यात जास्त कोरोना संक्रमितांची नोंद होत आहे. दरम्यान, जिल्ह्यात दररोज आठशे ते बाराशे कोरोनाबाधीत रुग्ण आढळून येत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाला रोखण्यासाठी बीड प्रशासनाने कंबर कसली आहे.

बीड जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी कार्यालयातच स्पेशल वॉर रूम स्थापन केली आहे. त्यामुळे बीड प्रशासनाला आता कार्यालयातूनच संपूर्ण जिल्ह्यावर नजर ठेवता येईल. याशिवाय ऑक्सिजन, बेडसह गंभीर रुग्णांवर कार्यालयातून करडी नजर असणार आहे. विशेष म्हणजे ही वॉररूम 24 तास सुरू आहे. जिल्हाधिकारी स्वतः रात्रभर या वॉररूमवर लक्ष ठेवून असतात.

बातम्या आणखी आहेत...