आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:भीषण अपघातात दांपत्य ठार, मृत दांपत्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचे चुलत बहीण-भाऊजी

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ममता या माजी अर्थमंत्री व भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या चुलत भगिनी आहेत.

कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर मातोरीजवळ झालेल्या अपघातात पती-पत्नी ठार झाल्याची घटना बुधवारी बीड जिल्ह्यातील मादळमोही (ता. गेवराई) येथे घडली. पुसद तालुक्यातील ममता पल्लेवाड आणि विलास पल्लेवाड असे अपघातात ठार झालेल्या दांपत्याचे नाव आहे. ममता या माजी अर्थमंत्री व भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या चुलत भगिनी आहेत.

पल्लेवाड दांपत्य मुलाला भेटण्यासाठी स्वत:च्या कारने (एमएच २९ आर ४२३०) पुण्याला जात होते. कारवरील नियंत्रण सुटले व कार भरधाव वेगात असल्याने पुलाखाली पडून हा भीषण अपघात झाला. कारचा अक्षरश: चुराडा झाला होता. अपघातानंतर परिसरातील लोकांनी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला फोन केल्यानंतर त्यांना उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...