आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:शस्त्रक्रियेनंतर ‘मुलगाच हवा’चा हट्ट सुटेना; तो रात्रभर मारत होता.. ती विव्हळत होती

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलगाच हवा म्हणून हातपाय बांधून मारहाण; पत्नीचा मृत्यू

आजारपणामुळे पहिला मुलगा दोन वर्षांपूर्वी मृत्यू पावल्याने दुसरा मुलगा व्हावा ही इच्छा होती, मात्र पत्नीची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली होती. त्यामुळे दुसरे लग्न करण्याच्या विचारातून सालगडी म्हणून काम करणाऱ्या पतीने रात्रभर हातपाय बांधून लाकडी दांड्याने क्रूरतेने जबर मारहाण करून पत्नीचा खून केला. हा प्रकार औरंगपूर (ता. बीड) येथे उघडकीस अाला. शनिवारी बीड ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पतीला अटक झाली. न्यायालयाने त्याला ८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. राधा महादेव रेड्डे (३१, रा. इरगाव, ता. गेवराई) असे मृत महिलेचे नाव आहे.

इरगाव (ता. गेवराई) येथील महादेव आसाराम रेड्डे पत्नी राधासह दहा महिन्यांपासून अौरंगपूर येथे कल्याण डरपे यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करताे. ते शेतातच वास्तव्यास होते. महादेवचा मुलगा शिवराम (८) २ वर्षांपूर्वी मृत्यू पावला होता. या दांपत्याला अश्विनी ही ४ वर्षांची मुलगीही आहे. शिवरामच्या मृत्यूनंतर मुलगा हवा असे म्हणत महादेव हा राधा यांना त्रास देऊन मारहाण करत असे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याने तुला मूल होणार नाही म्हणून मी दुसरे लग्न करतो म्हणून तो तिचा छळ करत होता.

मला लवकर दवाखान्यात न्या
५ फेब्रुवारी रोजी पहाटे परिसरात एक महिला राधा यांच्या घरी आली असता ‘ती’ हातपाय बांधलेल्या अवस्थेत होती. बेदम मारहाणीमुळे तिच्या पायांतून रक्त येत होते. शेजारणीने तिचे हातपाय सोडले. या वेळी राधा यांनी शेजारणीला मला दवाखान्यात घेऊन चला म्हणत विनवणी केली. शेजारणीने हा प्रकार शेतमालक डरपे व राधा यांच्या सासूला सांगितला.

रुग्णालयात नेताना रस्त्यात मृत्यू : हा प्रकार समजल्यानंतर राधा यांच्या सासू, शेतमालक हे औरंगपूरमध्ये आले. त्यांनी राधाला रिक्षा करून गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील आरोग्य केंद्रात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र रस्त्यातच राधाचा मृत्यू झाला. यानंतर ही माहिती तिच्या माहेरच्या मंडळींना देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...