आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:बीडमध्ये बसस्टँडसमोर 4 हल्लेखोरांकडून धारदार शस्त्राने तरुणाचा खून

बीडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

चार जणांच्या टोळक्याने २४ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करत खून केला. बीड शहरातील बसस्थानकासमोरील एचडीएफसी बँकेसमोर वर्दळीच्या ठिकाणी मंगळवारी दुपारी चार वाजता ही घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारापूर्वीच या तरुणाचा मृत्यू झाला आहे. खुनाच्या या घटनेमुळे बीड शहर हादरले आहे. शहरातील खासबाग भागातील तरुण शेख शाहिद शेख सत्तार (२४) हा उभा होता. याच वेळी तीन ते चार जण त्या ठिकाणी आले. हल्लेखोरांनी शेख शाहिद शेख सत्तार याच्या पोटावर व छातीवर शस्त्राने सपासप वार केले.

दरम्यान, हल्ल्याची घटना कशामुळे घडली हे अद्याप समजू शकले नाही. सायंकाळी सहा वाजेपर्यंत याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. बीड शहरातील बसस्थानकासमोरील एचडीएफसी बँकेसमोर शहरातील खासबाग भागातील तरूण शेख शाहिद शेख सत्तार (वय २४ ) हा ट्रॅव्हल्सला प्रवाशी मिळवून देण्याचे काम करत होता . प्रवाशी भरण्यावरून त्याचा दुपारी काही तरूणाशी वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रवाशी भरण्यावरून झालेल्या वादानंतर आलेल्या तीन ते चार हल्लेखोरांनी शेख शाहिद शेख सत्तार यांच्यावर प्राणघातक हल्ला करत पोटावर व छातीवर शस्त्राने सपासप वार केले. यानंतर हल्लेखोर पसार झाले.

या हल्ल्यात तरुण रक्ताच्या थारोळ्यात जागेवर कोसळला. ही घटना पाहून परिसरातील नागरिकांनी त्याचा जीव वाचवण्यासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता या ठिकाणच्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेे.

बातम्या आणखी आहेत...