आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पात्रुडमध्ये 27 वर्षीय महिलेवर अत्याचार:माजलगाव पोलिसात गुन्हा दाखल; 31 डिसेंबरच्या रात्री घरात घुसून केले कृत्य, आरोपी फरार

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील एका 27 वर्षीय महिलेवर घरात रात्री घरात घुसून अत्याचार केल्याची घटना रविवारी (दि.1) रात्री 1 वाजता घडली. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की, पात्रुड येथे महिला आपल्या मुलासह दि.31 डिसेंबर रोजी घरात झोपली होती. यादरम्यान रात्री 1 वाजता (दि.1 जानेवारी) अचानक घराचा दरवाजा वाजवला, यावर महिलेने कोण आले हे पाहण्यासाठी दरवाजा उघडला. ताहेर हा जबरदस्तीने घरात घुसून महिलेचे तोंड दाबून रूममध्ये ओढत नेऊन गेला. यावेळी महिलेच्या गालावर बोचकुरे ओढत बळजबरीने अत्याचार केला. आरडा ओरडा केलाच तर तुझ्या लेकरांना जीव मारील असे धमकावत अत्याचार केला. यावेळी आवाजाने घरातील मुले उठली असता त्यांच्या ओरडण्याचा आवाजाने शेजारील नागरिक धावले. यावर ताहेर शेख हा तेथून पळून गेला.

याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून ताहेर शेख यांच्या विरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पिंक मोबाईल पथकाच्या प्रमुख पोलिस उपनिरीक्षक निशिगंधा खुळे या करत आहेत. आरोपी अद्याप फरार आहे.

परळीत पत्नीवर अनैसर्गिक ​​​​​​​अत्याचार

परळीत डॉक्टरने 29 वर्षीय पत्नीशी अनैसर्गिक अत्याचार केला. तसेच मारहाण करून घराबाहेर हाकलून दिल्याची घटना धर्मापुरीत घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात डॉक्टरसह त्याच्या 7 नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलावरील अत्याचाराच्या घटनेत वाढ

बीड जिल्ह्यात महिलावरील अन्य अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे 2022 मध्ये एक वर्षात विवाहित महिलावरील अन्याय अत्याचाराच्या घटनांचा आकडा पाचशेच्या जवळपास गेला आहे. बीडच्या महिला आमदारांनी विधानसभेत बोलताना जर महिला आमदार बीडमध्ये सुरक्षित नसतील तर सामान्य महिलांच्या परिस्थिती काय असेल असा प्रश्न केला होता.

बातम्या आणखी आहेत...