आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना प्रतिबंधक लसीसाठी जिल्हा रूग्णालयात गर्दी होवुन गोंधळ उडत असल्याने जिल्हा रूग्णालयातील लसीकरण केंद्र नगर रोडवरील चंपावती विद्यालयात शुक्रवारी हलवले खरे परंतु पहिल्याच दिवशी या केंद्रावर नागरिकांची गर्दी उसळल्याने फिजीकल डिस्टनचा बोजावारा उडाला. गर्दी करणाऱ्या नागरिकांना आवरण्यासाठी केवळ दोन पोलिस बंदोबस्तावर होते. विशेष म्हणजे ४५ वर्षापूढील नागरिकांच्या दुसऱ्या डोसची कोव्हॅक्सीन ही लसच या ठिकाणी उपलब्ध नव्हती त्यामुळे केंद्रावर आलेल्या नागरिकांना हेलपाटा मारावा लागला.
बीड शहरातील नगर रोडवरील चंपावती प्राथमिक विद्यालयातील लसीकरण केंद्रावर आज शुक्रवारी सकाळी नऊ वाजल्या पासुन नागरिकांनी एकच गर्दी केली होती.या ठिकाणी तीन वेगवेगळे केंद्र करण्यात आले आहेत.पहिल्या केंद्रावर ४५ वर्षावरील २०० नागरिकांना दुसऱ्या डोसची व्यवस्था करण्यात आली होती.दुसऱ्या केंद्रावर २०० फ्रंटलाईन वर्कर केंद्रावर केवळ दुसरा डोस उपलब्ध करण्यात आला होता. परंतु पहिला डोस नव्हता. त्या कोवॅक्सीनची लस तर नव्हतीच. तिसऱ्या केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी व अपॉईंटमेंट घेण्यात येत होती.अशा केवळ २०० जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.त्याच बरोबर ज्या नागरिकांना लस देणे शिल्लक आहे अशांना जागेवरच नोंदणी करून कोवीशिल्डचा दुसरा डोस रांगेत असलेल्या नागरिकांना देण्यात आला.
चंपावती विद्यालयातील तीनही केंद्रावर प्रत्येकी तीन कर्मचारी ,दोन नोदणीसाठी कर्मचारी व एक लस देण्यासाठी वर्ग चारचा कर्मचारी उपस्थीत होता. विशेष म्हणजे या पूर्ण केंद्रासाठी आरोग्य विभागाने एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. या ठिकाणी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज आहे. सकाळी नऊ वाजल्या पासुन नागरिकांनी लस घेण्यासाठी एकच गर्दी केली असल्याने फिजीकल डिस्टन्सचा बोजवारा उडाला होता.
गर्दी आवरण्यासाठी केवळ दोन पोलिस
चंपावती विद्यालयातील लसीकरण केंद्रावर सकाळी नऊ वाजल्या पासुन शुक्रवारी गर्दी उसळली परंतु या गर्दीवर नियंत्रणासाठी केवळ दोन पोलिस दिसुन आले. विशेष म्हणजे या केंद्रावर जिल्हा शल्यचिकित्सक सूर्यकांत गिते यांनी सहा पोलिस व १२ होमगार्डचा बंदोबस्त द्यावा अशी मागणी शिवाजीनगर पोलिस ठाण्याला केली आहे.
आलेली १२ हजार लस कुठे गेली ?
चंपावती विद्यालयातील या लसीकरण केंद्रावर शुक्रवारी कोवॅक्सीन लस उपलब्धच नव्हती. दुसरा डोस घेण्यासाठी जेंव्हा नागरिक या केंद्रावर आले तेंव्हा त्यांना लसच उपलब्ध नाही असे या ठिकाणी सांगण्यात आले. त्याच बरोबर एका फलकावर कोवॅक्सीन लस उपलब्ध नसुन उपलब्ध झाल्यावर त्वरीत लसीकरण करण्यात येईल असे सांगण्यात आले. पंरतु लस कधी उपलब्ध होणार हे नागरिकांना सांगीतले गेले नाही. पालकमंत्री धंनजय मुंडे यांच्या पुढाकारातुन बीड जिल्ह्यासाठी आलेली १२ हजार कोवॅक्सीन लस कुठे गेली असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.