आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन‎:भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्हा‎ सचिव राजेंद्र बांगर यांचे निधन‎

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्हा सचिव‎ राजेंद्र केशवराव बांगर (५२) यांचे शुक्रवारी पुणे‎ येथे उपचारादरम्यान दुपारी चारच्या सुमारास निधन‎ झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी,‎ भाऊ, बहिणी, चुलते, पुतणे असा मोठा परिवार‎ आहे. आज शनिवारी त्यांचे‎‎ पार्थिव बीड मधील विद्यानगर‎ ‎ पश्चिम येथील राहत्या घरी‎ ‎ आणले जाईल व सकाळी साडेआठ पर्यंत अंतिम‎ दर्शनासाठी ठेवले जाईल.

तर‎ सकाळी ११ वाजता उक्कड पिंप्री (ता. गेवराई) येथे‎ त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.‎ संघटना बांधणीचा अनुभव असल्याने भाजपा बीड‎ जिल्हा सचिवपदाची जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर‎ सोपवली होती. विविध राजकीय पक्षातील नेते,‎ कार्यकर्त्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांच्या‎ धनाने जिल्ह्यातील सर्व पक्षीय कार्यकर्ते व मित्र‎ परिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे.‎

बातम्या आणखी आहेत...