आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुखद:बीडमध्ये उपचार घेतलेले पहिले दोघे झाले कोरोनामुक्त, जिल्हा प्रशासनाने दिला वाजतगाजत डिस्चार्ज, केकही कापला 

बीडएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५५ वर गेलेल्या बीड जिल्ह्याला काही अंशी दिलासा

जिल्हा रुग्णालयात उपचार घेऊन पहिले दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आता कोरोनामुक्त झाले असून , त्यांना जिल्हा प्रशासनाने  बुधवारी सकाळी वाजत गाजत डिस्चार्ज दिला. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५५  वर गेलेल्या बीड जिल्ह्याला काही अंशी दिलासा मिळाला आहे.

बीडच्या माजलगाव तालुक्यातील हिवरा आणि गेवराई तालुक्यातील इटकूर येथील ते कोरोनामुक्त झालेले रुग्ण असून ते आता घरी परतले आहेत.कोरोनाची ही लढाई त्यांनी जिंकल्यामुळे त्यांचे मोठ्या उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी पोलीस पथकाने बँड वाजूवन वाजत-गाजत स्वागत केले.शिवाय जिल्हा रुग्णालय परिसरात या रुग्णाने केकही कापून आनंद व्यक्त केला..यावेळी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...