आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिंद्रुड:भरधाव टेम्पोची ऊस वाहतुक करणाऱ्या बैलगाडीला धडक; एक बैल जागीच ठार तर एका बैलासह ऊसतोड मजुर पती पत्नी गंभीर जखमी

दिंद्रुडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • खासदार प्रितम मुंडे यांनी त्या जखमी ऊसतोड मजुर पती पत्नी यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांना धीर दिला.

कुप्पाजवळील तेलगाव येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्यास ऊस घेऊन येणाऱ्या बैलगाडीला एका भरधाव वेगात जाणाऱ्या आयशर टेम्पोने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक बैल जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना परळी बीड महामार्गावर लोनवळ फाट्याजवळ घडली. या अपघातात ऊसतोड मजुर पती पत्नी गंभीर जखमी झाले. दरम्यान या अपघाताची माहिती समजताच बीडच्या खासदार प्रितम मुंडे यांनी जखमी ऊसतोड मजुर पती पत्नीची आस्थेवाईक चौकशी करून धीर दिला.

सविस्तर माहिती अशी की, तेलगाव येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्यास बैलगाडीने ऊस वाहतुक करणारे ऊसतोड मजुर रामेश्वर साहेबराव वारे आपली पत्नी सौ. किस्किंदा रामेश्वर वारे यांच्या सह हे नित्याप्रमाणे रविवारी दुपारी कुप्पा येथील ऊस बागायतदार शेतकरी सौ.चंद्रकला किशन काळे यांच्या शेतातुन ऊस तोडणी करून आपल्या बैलगाडीत टाकुन तेलगाव येथे साखर कारखान्याकडे येत असताना लोनवळ फाट्याजवळ तेलगावकडुन भरधाव वेगात येणाऱ्या आयशर टेम्पो क्र.एम.एच.13 आर 3580 ने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक बैल जागीच ठार झाला. तर दुसरा बैल गंभीर जखमी झाला. तसेच ऊसतोड मजुर रामेश्वर साहेबराव वारे व त्यांच्या पत्नी सौ किस्किंदा रामेश्वर वारे हे ऊसतोड मजुर पती पत्नी गंभीर जखमी झाले असुन त्यांना माजलगाव येथील एका रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

सदर ॲयशर टेम्पो हा विज ट्रान्सफार्मर वाहतुक करणारा असुन, तो उदगीर येथील अमित ईलेक्ट्रीक्ल्सच्या विज ट्रान्सफार्मर ठेकेदार असलेल्या केदार पाटील यांचे विज ट्रान्सफार्मर टेम्पोत असल्याचे घटनास्थळी सांगितले. टेम्पो चालकाचे नाव शेख जिलानी असल्याचे समजते. त्यास वडवणी पोलीसांनी ताब्यात घेतले असून दरम्यान या अपघाताची माहिती समजताच ऊसतोड संघटनेचे कृष्णा तिडके यांनी घटनास्थळी भेट देऊन ही माहिती खासदार प्रितम मुंडे यांना दिली. दरम्यान, मुंडे यांनी त्या जखमी ऊसतोड मजुर पती पत्नी यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांना धीर दिला. तसेच त्यांच्यावर उपचार करणाऱ्या संबंधित डॉक्टरशी खा. मुंडे यांनी चर्चा केली.

बातम्या आणखी आहेत...