आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडचे वर्चस्व:18 पैकी 8 जागा ताब्यात, अधिसभेवर बीडचे वर्चस्व

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत १८ पैकी ८ जागा जिंकून बीड जिल्ह्याने वर्चस्व अबाधित ठेवले आहे. विद्यापीठाच्या बॅडमिंटन सभागृहात अधिसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी १० वाजता सुरु झाली. सर्वच गटासाठींची मतमोजणी एकाच वेळी सुरू करण्यात आली असून यासाठी पहिल्या शिफ्टमध्ये ८० जणांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी दिली.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुक प्रक्रिया राबण्यिात आली. या निवडणुकीत विजयी झालेल्या १८ उमेदवारात बीड जिल्ह्यातील ८ जणांचा समावेश आहे.

यामध्ये प्राचार्य गटातून बनसारोळा येथील जनविकास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब गोरे - १५ मते, शिरूर कासार येथील कालिकादेवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विश्चास कंधारे - १३ हे खुल्या गटातून कोटा पूर्ण करून विजयी झाले. तर अनुसूचित जाती प्रवर्ग - डॉ.गौतम पाटील - ४६, भटके विमुक्त जाती-जमाती प्रवर्ग - (व्हिजेएनटी) डॉ.गोवर्धन सानप- -५२ हे निवडण आले. डॉ.शिवदास झुलाल शिरसाठ हे बिनविरोध निवडून आले आहेत.

संस्थाचालक महिला गटातून अर्चना बाळासाहेब चव्हाण (अर्चना रमेश आडसकर), व नितीन उत्तमराव जाधव (अनूसूचित जमाती प्रवर्ग) तसेच (अनूसूचित जमाती प्राचार्य प्रवर्गातून) तसेच गोविंद बालासाहेब देशमुख (घाटनांदूर) हे विजयी झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...