आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेठ बीड परिसरामधील गणपती उत्सवांची परंपरा वैभवसंपन्न:गणेश मंडळांनी समाजोपयोगी देखाव्यातून जपली संस्कृती; जिल्हाधिकारी राधाबिनाेद शर्मा यांचे प्रतिपादन

बीड | रवी उबाळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीड शहरामधील गणेश उत्सवाची परंपरा ही माेठी प्रेरणादायी आणि उत्सवाही आहे. पेठ बीड भागातील विविध गणेश मंडळांची देखावे आणि शहरातील नागरिकांची देखावे पाहण्यांसाठी होणारी गर्दी ही वैभवसंपन्नता दर्शवनारी आहे. अनेकांनी जुन्या आठवणीतून पेठ बीडच्या गणेश मंडळाची माहिती याठिकाणी सांगितली आहे.

कोरोनानंतरच्या कालावधीतही पेठ बीड मधील गणेश मंडळांनी समाजाेपयाेगी व शासनाने जाहीर केलेल्या उपक्रमे राबवून आदर्श निर्माण केला आहे. पेठ बीडच्या गणेश मंडळांनी देखाव्यातून जपली संस्कृती शहरातील नागरिकांना प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाबिनाेद शर्मा यांनी व्यक्त केले.

सोमवारी ( दि.5) रात्री 7.30 वाजता शनी मंदिर गल्ली, विठ्ठल मंदिर चौक पेठ बीड येथे सिंहाचे प्रवेशद्वारे असणाऱ्या शंभर फुट लांब गुहेतून माँ वैष्णो देवी प्रतीकृतीचे दर्शने उद्घाटन जिल्हाधिकारी शर्मा यांनी केले. यावेळी पेठ बीड कृती समितीचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष अमृत काका सारडा, राजयोग फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम धूत, मंडळाचे मार्गदर्शक गिरीष गिलडा यांची प्रमुख उपस्थित हाेती. यावेळी बीडचा राजा न्यू गणेश मित्र मंडळ अध्यक्ष बबलू गिलडा, कार्याध्यक्ष विशाल शर्मा, उपाध्यक्ष व्यंकटेश दोडे, सचिव सतीश पगारिया, कोषाध्यक्ष कृष्णा मुंदडा, सह नरेश मुंदडा, प्रगेश‌ कुलकर्णी, अभिजीत दोडे, फामजी पारिख, पुष्कर मुंदडा, गोविंद शर्मा, गोपाल शर्मा, मयुर गिलडा, ऋषिकेश मुंदडा, श्रेयस गिलडा, राम पारिख, शाम पारिख, गोविंद शर्मा, गणेश लोंढे यांनी जिल्हाधिकारी शर्मा यांचे स्वागत केले. त्यानंतर जिल्हाधिकारी शर्मा यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

गणेश मंडळात आरती

पेठ बीड भागातील राष्ट्रीय गणेश मंडळाच्या श्री गणेशाची आरती केल्यानंतर जिल्हाधिकारी शर्मा यांनी विविध उपक्रमांची पाहणी केली. याप्रसंगी नगर सेवक सम्राट चौव्हाण, जवाहरलाल सारडा, राष्ट्रीय गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अमृत काका सारडा, गिरीशजी गिलडा, अध्यक्ष डॉ. अभिजीत पायगुडे कार्याध्यक्ष नितीन सारडा आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी प्रास्ताविक करताना संस्थापक अध्यक्ष अमृत काका सारडा यांनी राष्ट्रीय गणेश मंडळाच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती सांगून यावर्षी मंडळाच्या वतीने पर्यावरण पूरक गणेश विसर्जन मिरवणुकीचा माहिती देऊन गणेश मंडळाच्या वतीने आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर वृक्षारोपण कार्यक्रम यासह विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.यावेळी अमोल शेटे, महादेव कैवाडे, राम कदम, अशोक घोडके, अक्षय इगडे, ओंमकार सपकाळ, राम इगडे, सुशील महालिंगे, नितीन इगडे, तेजस महाजन आकाश इगडे संजय वाघोळे, वरद मुसळे, प्रमोद शिंदे यांच्यासह राष्ट्रीय गणेश मंडळाचे पदाधिकारी, सदस्य नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

पायी फिरून पाहणी

जिल्हाधिकारी शर्मा यांनी मंदिर गल्ली, विठ्ठल मंदिर चौक पेठ बीड येथे सिंहाचे प्रवेशद्वारे असणाऱ्या शंभर फुट लांब गुहेतून माँ वैष्णाे देवी प्रतीकृतीचे दर्शने उद्घाटन केल्यानंतर स्वत: पायी चलत पेठ बीड भागातील गणेश मंडळांना भेटी दिल्या. विठ्ठल मंदीर चाैक, काळा हनुमान ठाणा, शुक्रारवार पेठ भागामधून पायी चालत मंडळांच्या कामांची पाहणी केली. बीडचा राजा न्यू गणेश मित्र मंडळ, समर्थ गणेश मंडळ, राष्ट्रीय गणेश मंडळ या तिन मंडळामध्ये गणपती बाप्पाची आरती केली.

पाहून संस्कृती जपावी

पेठ बीड भागातील गणेश उत्सव परंपरा जुनी आहे. काेराेना नंतर पुन्हा मंडळांकडून देखावे साकारले जात आहेत. यंदाच्या देखावे पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी संस्कृतीची जपवणूक करावी तसेच मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना पाठबळ द्यावेत. - अमृत काका सारडा, माजी उपनगराध्यक्ष

बातम्या आणखी आहेत...