आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेवराईतील घटना:भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर, पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा; शाळकरी मुलाचा रेबीजने मृत्यू

गेवराई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तो दुसरीच्या वर्गात शिकत होता.

पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर वेळेत लक्षात न आल्याने शाळकरी मुलाचा रेबीजने मृत्यू झाला. पुनित जितेंद्र मुंदडा (वय 8 वर्ष , रा.सरस्वती कॉलनी क्रमांक.1 गेवराई) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. कुत्रा चावलेला लक्षात न आल्याने पुनितने कुत्रे चावल्याचे कुणालाच सांगितले नाही. 15-20 दिवसांत रेबीजच्या प्रभावाने त्याची प्रकृती बिघडली. कुत्रा चावल्यामुळे होणाऱ्या रेबीजवर आजतागायत परिपूर्ण इलाज नाही. यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने गेवराईतील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पुनित आईवडिलांसह सरस्वती कॉलनी क्रमांक 1 राहत होता. जितेंद्र मुंदडा दाम्पत्याचा तो धाकला मुलगा. तो दुसरीच्या वर्गात शिकत होता. सरस्वती कॉलनी क्रमांक 1 जवळील रस्त्यात सायकल चालवत असताना कुत्रा मागे लागल्याने पुनित घाबरला. त्या दरम्यान सायकल वरून पडला व पिसाळलेल्या त्या कुत्र्याने त्याच्या कानाजवळ चावा घेतला. रस्त्यावर वर्दळ नव्हती, ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही. सायकलवरून पडल्याने मार लागला म्हणून घरी पुनितने सायकल वरून पडल्याचे सांगितल्याने. त्या दृष्टीने त्याच्यावर उपचार केले गेले. प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला औरंगाबाद येथे हलवण्यात आले. येथील डॉक्टरांनी रक्ताची तपासणी केल्यानंतर रेबीज झाल्याचे लक्षात आले. उपचाराला विलंब झाल्याने रेबीजची लक्षणे बळावल त्याचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...