आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना नव्हे भुकेचा बळी:पुण्यावरून उपाशीपोटी परभणीसाठी पायीच निघाला होता मजूर, बीडच्या धानोरा येथे पोहोचताच भुकेने झाला करुण अंत

बीडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेकडो किमी चालून विश्रांती घेण्यासाठी एका पत्र्याखाली झोपला, कधीच उठला नाही

जिल्ह्यातील धानोरा गावात एका 40 वर्षीय मजुराचा मृतदेह सापडला आहे. पिंटू पवार असे या मजुराचे नाव होते तसेच तो मूळचा परभणीचा रहिवासी होता. पुण्यात तो मोलमजुरी करत होता. परंतु, कोरोना आणि लॉकडाउनमुळे हातात काम नसल्याने तो पुण्यावरून आपल्या मूळ शहर परभणीच्या दिशेने पायीच निघाला होता. उपाशीपोटी पायीच चालत तो थेट बीडपर्यंत पोहोचला सुद्धा. परंतु, धानोरा या गावात पोहोचता-पोहोचता भुकेने आणि रग-रगत्या उकाळ्याने त्याचा जीव गेला. ही घटना बुधवारी समोर आली आहे.

अंभोरा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडच्या धानोरा गावात या मजुराचा मृतदेह सापडला. येथून या मजुराचे गाव अजुनही 200 किमी दूर होते. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अती चालणे, भूक आणि डिहायड्रेशन यांना मृत्यूसाठी कारणीभूत ठरवण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, त्याचा मृत्यू 15 मे रोजीच झाला होता.

नेमके काय घडले...

पिंटू (40) परभणीतील धोपटे पोंडूळ गावाचा रहिवासी होता. या ठिकाणी तो ऊसतोड कामगार म्हणून काम करत होता. लॉकडाउन आणि हातात काम नसल्याने काही तरी मिळेल या अपेक्षेने तो पुण्यात आपल्या भावाकडे गेला होता. परंतु, त्या ठिकाणी सुद्धा त्याच्या हाती निराशाच आली. यानंतर 8 मे रोजी त्याने पायीच पुण्याहून थेट परभणी गाठण्याचा निर्णय घेतला. 14 मे रोजी तो अहमदनगर पर्यंत पोहोचला. त्याच्याकडे मोबाईल नव्हते. त्यामुळे, तो कुठे आहे याचा ठावठिकाणाच कुटुंबियांना नव्हता. 14 मे रोजी त्याने एकाचा मोबाईल घेऊन कुटुंबियांना कळवले होते.

कुटुंबियांना आपली कैफियत सांगितल्यानंतर तो पुन्हा 30 ते 35 किमी पायी चालत बीडच्या धानोरा गावात पोहोचला. या ठिकाणी त्याने एका पत्र्याखाली विश्रांती घेतली आणि झोपेतून कधीच उठला नाही. याच परिसरातून जाणाऱ्या एका व्यक्तीला सोमवारी उग्र दुर्गंध आली. त्यांनी वेळीच पोलिसांना फोन करून घटनास्थळी बोलावले. तेव्हा पिंटू पवारचा मृतदेह याच पत्र्याखाली सापडला. कुटुंबियांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. तसेच पोस्टमॉर्टम केल्यानंतर प्रशासन आणि ग्राम पंचायतने धानोरातच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.

बातम्या आणखी आहेत...