आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:आष्टीत बिबट्याचा धुमाकूळ सुरूच, आज मायलेकावर केला प्राणघातक हल्ला; यापूर्वी दोघांचा घेतला आहे बळी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • धनवडे आणि मंगरूळ वस्तीच्या दरम्यान हा प्रकार घडला असून वन विभागाची पथके दिंडे वस्तीच्या तिथे आली आहे.

तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे. शहरापासून सात कि.मी.अंतरावर असलेल्या मंगरूळ येथील दिंडेवस्तीवर महिलेवर हल्ला करत महिलेने आरडाओरड करताच बिबट्याने तेथून पळ काढला. सदरील महिलेला आष्टी येथील ग्रामिण रूग्णालयात उपचारासाठी आणले आहे. तालुक्यात मागील चार दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून दोघाजणांना बिबट्याच्या हल्ल्यात प्राण गमवावे लागले आहेत.

शनिवारी (दि.28) सायंकाळी 6 वा. बिबट्याने दिंडे वस्तीवरील मायलेकरावर हल्ला केल्याची घटना समोर आली असून यामध्ये त्यांना दुखापत झाली आहे. या मायलेकरावर आष्टीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत असून बिबट्याच्या या हल्ल्यामुळे आष्टीत आणखी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिलावती दत्तात्रय दिंडे (वय 33) आणि अभिषेक दत्तात्रय दिंडे (वय15) हे मायलेकरं दिंडे वस्तीवरील आपल्या रानामध्ये तुरीच्या शेंगा तोडत असतांना बिबट्याने या दोघांवर हल्ला चढवला. यामध्ये शिलावती यांच्या हाताला आणि कमरेच्यावर दुखापत झाली असून अभिषेकच्या हातालाही बिबट्याचे दात लागले आहेत.

या दोघांनी हल्ल्यानंतर आरडाओरड करण्यास सुरूवात केल्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला. सुदैवाने यात कुठलीही जिवितहानी झाली नसून या प्रकारामुळे मात्र गावात तणावाचे वातावरण पसरले आहे. धनवडे आणि मंगरूळ वस्तीच्या दरम्यान हा प्रकार घडला असून वन विभागाची पथके दिंडे वस्तीच्या तिथे आली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser