आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड नगरपंचायत निवडणुकीत ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी राखीव जागांसाठीची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली गेली होती. या जागांवर सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला गेला होता. यासाठी सोमवार हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. अखेरच्या दिवशी अर्ज करण्यासाठी सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी आणि अपक्षांनीही गर्दी केली होती.
जिल्ह्यात आष्टी, पाटोदा, शिरूर, केज व वडवणी या पाच नगरपंचायतींमधील २० जागांसाठी २६८ जणांनी अर्ज केले आहेत. आज मंगळवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आहे. पाटोद्यात शेवटच्या दिवशी गर्दी : पाटोद्यात एकूण ६४ अर्ज दाखल झाले असून सोमवारी शेवटच्या दिवशी ५७ जणांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. २९ डिसेंबर २०२१ पासून या चार प्रभागांसाठी खुल्या प्रवर्गातून अर्ज स्वीकारणे सुरू झाले होते. खुल्या प्रवर्गातून असल्यामुळे इच्छुकांची मोठी गर्दी या वेळी पाहायला मिळाली.
नगर पंचायतीत काँग्रेसच्या वतीने उमेदवारांचा अर्ज दाखल केला गेला.
शिरूर, आष्टीत ३९ अर्ज शिरूर नगरपंचायतीचे चार प्रभाग व आष्टी नगरपंचायतीच्या चार प्रभागांसाठी प्रत्येकी ३९ अर्ज दाखल झाले आहेत. दोन्ही तालुक्यातील नगरपंचायतीत राष्ट्रवादी व भाजपने जोर लावलेला असून या चारही प्रभागांत अशाच प्रकारे सरळ लढत होणार आहे.
वडवणीत ५६ अर्ज दाखल वडवणीत ४ जागांसाठी ५६ जणांनी अर्ज दाखल केले. यामध्ये प्रभाग ४ साठी ८ अर्ज, प्रभाग ५ साठी १७ अर्ज, प्रभाग ६ साठी ९ अर्ज, तर प्रभाग १३ साठी २२ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीकडून प्रभाग क्रमांक ५ व १३, तर राष्ट्रवादी पुरस्कृत प्रभाग क्र ४ व ६ यामध्ये अर्ज दाखल के ले. भाजपकडून प्रभाग क्र चारही ठिकाणी उमेदवार दिले.
केजमध्ये ७० अर्ज केज येथील नगरपंचायतीच्या ४ प्रभागासाठी ७० उमेदवारी अर्ज दाखल झाले. प्रभाग क्र. १ साठी १८, प्रभाग क्र. २ साठी १३, प्रभाग क्र. ८ साठी १९, तर प्रभाग क्र. १२ साठी २० उमेदवारी अर्ज आले आहेत. मंगळवारी छाननी व १० जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.