आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केज:अभ्यास कर म्हणत आईने टीव्ही बंद केला, अन् मुलाने उचलले टोकाचे पाऊल, 19 वर्षीय मुलाची गळफास घेत आत्महत्या

केजएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चैतन्य वेदांत वेद विद्यालयात मागील पाच वर्षांपासून वेद शास्त्राचे शिक्षण घेत होता.

टीव्ही नीट बसुन पहा व अभ्यास कर म्हणत आईने टीव्ही बंद केल्यावरून एका 19 वर्षीय विद्यार्थ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज शहरातील वकीलवाडी भागात शनिवारी ( दि. 3 ) घडली.

केज शहरातील वकीलवाडी भागात वास्तव्यास असलेले अनंत कोकीळ यांचा मुलगा चैतन्य कोकीळ ( वय 19 ) हा अहमदनगर येथे वेदांत वेद विद्यालयात मागील पाच वर्षांपासून वेद शास्त्राचे शिक्षण घेत होता. सध्या कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने तो घरी आला होता. शनिवारी सकाळी त्याने ऑनलाईन अभ्यास केला. त्यांनतर तो घरात झोपून टीव्ही पाहत असल्याने त्याच्या आईने त्यास टीव्ही नीट बसून पहा व अभ्यास कर असे म्हणून टीव्ही बंद केला. आईने टीव्ही बंद केल्याने चैतन्य याने दुसऱ्या खोलीत जाऊन घराचे दार बंद केले आणि घरातील छतास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. चैतन्य याच्या पार्थिवावर क्रांतीनगर येथील स्मशाभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...