आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिद्द:बीपी, शुगर असून 80 वर्षाच्या आजीबाईंनी केली कोरोनावर मात

केज21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • त्रास होत असेल तर डॉक्टरांना दाखवावे

माणसाकडे प्रबळ इच्छा शक्ती असल्यास कोणत्याही संकटावर मात करू शकतो हे आडस ( ता. केज ) येथील 80 वर्षाच्या आजीबाईंनी दाखवून दिले आहे. त्यांनी बीपी, शुगर हे आजार असताना ही कोरोना आजाराला अवघ्या चार दिवसात मात देऊन घरी परतल्या आहेत. सध्या त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. आडस येथील राजकुमारी पितांबरसिंह पवार ( वय 80 वर्ष ) या भावकीतील लग्न सोहळ्याला परिवारासह उपस्थित होत्या. लग्नानंतर लग्न सोहळ्यातील उपस्थितांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यातच तीन - चार दिवसांनी त्यांच्यासह घरातील काही सदस्यांना कोरोना आजाराच्या लक्षणांचा त्रास सुरू झाला.

त्यामुळे पवार कुटुंबीयांनी 10 एप्रिल रोजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटीजन टेस्ट केली असता राजकुमारी पवार यांच्यासह व घरातील दोन सदस्य पॉझिटिव्ह आले. या सर्वांना लोखंडी सावरगाव येथील शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मधुमेह, रक्तदाब असे आजार व वय 80 वर्ष असतानाही प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर राजकुमारी पवार या आजीबाईंनी चार दिवसात कोरोनावर मात करीत ठणठणीत झाल्या. कोरोनाची मोठी भीती बाळगणाऱ्या तरुणांसाठी ही आदर्श घेण्याची गरज आहे. त्यांच्या घरात 5 कोरोना बाधित रुग्ण असून ते ठणठणीत आहेत. दोन रुग्ण तर डॉक्टरांच्या सल्ल्याने होम आयसुलेट राहूनच उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले आहेत.

त्रास होत असेल तर डॉक्टरांना दाखवावे

लोकांनी कोणताही आजार अंगावर काढू नये काहीही त्रास होत असेल तर डॉक्टरांना दाखवावे व कोरोना तपासणी करून घ्यावी.

बातम्या आणखी आहेत...