आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:पोलिसांकडून वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण, आरोग्य कर्मचाऱ्यांचे आज कामबंद आंदोलन

आष्टी, बीड (रोहित देशपांडे)2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आष्टी तालुका आरोग्य संघटनेच्यावतीने आज (दि. 6 रोजी) कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय

संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी सध्या पोलिस कारवाई करत आहेत. माञ, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची कोणतीच खाञी न करता त्यांनाही मारहाण करणे. अडवून दंड करण्याचा प्रकार बुधवारी जिल्ह्यात पाहायला मिळाला आहे. तालुक्यातील टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. विशाल वनवे यांना बीड येथील चऱ्हाटा फाट्यावर पोलिसांनी बेदम मारल्याच्या निषेधार्थ आष्टी तालुका आरोग्य संघटनेच्यावतीने आज (दि. 6 रोजी) कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यातील लसीकरणही खोळंबले आहे

याबाबत तालुक्यातील आरोग्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की , बुधवारी सांयकाळी आष्टी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ . विशाल वनवे हे आपले कर्तव्य बजावून आपल्या गावाकडे सांयकाळी निघाले होते . त्यांना चहाटा येथे पोलिसांनी अडविले व कुठून आला , कुठे चालला असे आर्वच्यभाषेत विचारले . सदरील डॉक्टरांनी आपल्याकडील असलेले ओळखपत्र दाखविले व मी आत्ताच डियुटी करून आलो आहे. आता घरी चाललो आहे. असे सांगत असतानाच एका पोलिस कर्मचाऱ्याने कसलाच विचार न करता पाठीमागून काठी मारली. तर तीन चार पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण केली.

बातम्या आणखी आहेत...