आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळी शहराची ओळख इतिहास जमा:आयुर्मान संपल्यामुळे औष्णिक विद्युत केंद्रातील ऐतिहासिक 120 फूट उंच चिमणी पाडली

परळी23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक 3 ची ऐतिहासिक चिमणी सोमवारी सकाळी जमीनदोस्त करण्यात आली. परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचे प्रतीक बनलेल्या तीन धुराच्या चिमण्यांपैकी ही एक चिमणी 120 फूट उंचीची होती.

आयुर्मान संपल्यामुळे ही चिमणी पाडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

परळी शहराची ओळख असलेली ही चिमणी पाडतानाचा व्हिडिओ समोर आला असून अवघ्या 25 सेकंदात ही चिमणी जमीनदोस्त झाल्याचे पाहायला मिळते. यावेळी विद्युत केंद्राचे अधिकारी, सुरक्षा विभागाचे कर्मचारी आणि कंस्ट्रक्शन विभागाचे कामगारही उपस्थित होते.

सद्यस्थितीला परळी येथे एकूण 8 संच निर्माण करण्यात आलेले आहेत. त्यापैकी संच क्रमांक एक, दोन, तीन हे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. संच क्रमांक तीनमधील सर्व मशिनरी यंत्रणा व या संचाच्या संबंधित सर्व विभाग हे एक एक करून नाहीसे करण्यात येत आहेत. संच क्रमांक 3 ची मेगावॅट क्षमता ही 210 होती.

मराठवाड्यातील एकमेव प्रकल्प

परळी औष्णिक विद्युत केंद्र हा कोळशापासून विद्युत निर्मिती करणारा मराठवाड्यातील एकमेव प्रकल्प आहे. 1971 साली या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राची स्थापना झाली. त्यावेळी धूर वाहण्यासाठी तीन चिमण्या निर्माण करण्यात आल्या होत्या. 1971 पासून या तीन चिमण्या परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचे प्रतीक बनल्या होत्या. इटालियन तंत्रज्ञानाचा वापर करून हे जुने विद्युत केंद्र बनवण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...