आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:परळी शहर पोलिसांची सर्च ऑपरेशन राबवत मोठी कारवाई, 3 रिव्हॉल्वरव 8 काडतुसे केली जप्त; एक आरोपी ताब्यात

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी शहरात शुक्रवारी दसऱ्याच्या दिवशी गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी शहरातून तीन अत्याधुनिक रिव्हॉल्वर व आठ काडतुसे जप्त केल्याची माहिती हाती आली आहे. या प्रकरणात मध्य प्रदेश येथील एकास ताब्यात घेतले आहे. याबाबत परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

परळी शहर पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवत आजवरची मोठी कार्यवाही केली आहे. मध्य प्रदेशातील एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकरवी देण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर तीन अत्याधुनिक रिव्हॉल्व्हर आणि 8 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कार्यवाही गुन्हे शोध पथकाचे प्रमुख भास्कर केंद्रे, शंकर बुडडे, गोविंद भताने, मधुकर निर्मळ यांनी केली. ऐन विजयादशमीच्या आदल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी मध्य प्रदेशातील एका एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर शोध घेत पोलिसांनी ही कार्यवाही केली. मराठवाड्यातील ही सर्वात मोठी कार्यवाही समजली जाते आहे. या घटनेतील आणखी धागेदोरे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत असून रात्री उशिरपर्यंतही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच असून वरिष्ठ अधिकारी पोलीस ठाण्यात पोचले आहेत.

परळी शहर पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे, करण ऐन सनासुदिच्या दिवसांत पोलिसांवर कामाचा प्रचंड तणाव असतांना त्यांनी ही मोठी कामगिरी करून दाखवली आहे.

बातम्या आणखी आहेत...