आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:नामलगाव येथील पी. एस. कॉटन ऑईल केक इंडस्ट्रीजला शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 90 लाखांचे साहित्य जळून खाक

बीड22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • , कंपनीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असून यामध्ये 90 लाखांचा नुकसान झाल्याचे म्हटले आहे.

बीड तालुक्यातील नामलगाव येथील पी. एस. कॉटन ऑईल केक इंडस्ट्रीज एल एल पीमध्ये आज सकाळी तारीख 24 एप्रिल रोजी आग लागल्याची घटना घडली. दरम्यान, इंडस्ट्रीजमध्ये शॉर्ट सर्किट झाली असून यामध्ये पेंड, सरकी, मशनरी आणि बिल्डिंगचे इतर साहित्य जळून खाक झाले आहे. कंपनीचे मालक शामसुंदर चरखा व अजय घोडके यांना घटनेची माहिती कळताच त्यांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. गेवराई आणि बीड नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने ताबडतोब घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, काही वेळानंतर त्यांना आगी आगीवर नियत्रंण मिळवता आले.

कंपनीचे मालक शामसुंदर चरखा यांच्या मते, कंपनीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असून यामध्ये 90 लाखांचा नुकसान झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे संबंधित घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.

बातम्या आणखी आहेत...