आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस चालकाने विष घेतले:कामावर आला नाहीस तर बडतर्फ करतो! अधिकाऱ्याच्या धमकीनंतर येऊन बस तर काढली; पण वाटेतच विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक

आष्टी25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अधिकाऱ्याने बळजबरी कामावर बोलावल्यानंतर एका एसटी बस चालकाने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. कडा येथे गुरुवारी दुपारी 3 वाजता ही घटना घडली. आष्टी आगाराच्या आष्टी-पुणे या जादा बसवर अधिकाऱ्यांनी चालकाला बळजबरीने पाठवले. बाळू कदम असे त्यांचे नाव असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

बाळू कदम असे विष घेतलेल्या चालकाचे नाव असून सध्या त्याच्यावर आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. याच दरम्यान बस चालकाचे समर्थन करत आष्टी आगाराच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. आमचा जीव गेल्यावर तुम्ही आमच्याकडे लक्ष देणार का असा सवाल हे कर्मचारी करत आहेत.

बाळू कदम यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
बाळू कदम यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

गेल्या 15 दिवसांपासून एसटी कामगारांचे काम बंद अंदोलन सुरू आहे. यामुळेच राज्यातील जवळपास 150 आगार बंद आहेत. पण, आष्टी आगारात मात्र कामकाज सुरळीत आहे. या आगारातून 55 बस फेऱ्या अशा पद्धतीने काम चालते.

याच ठिकाणी गुरुवारी दुपारी दोन वाजता आष्टीचे आगार प्रमुख संतोष डोके यांनी वाहनचालक बाळू महादेव कदम (40) यांना कर्तव्यावर येण्यास सांगितले. परंतु बाळू कदम यांनी ड्युटीवर येण्यास नकार दिला. त्यावरून संतापलेले एसटीचे अधिकारी गायकवाड आणि नागरगोजे यांनी आला नाहीस तर बडतर्फ करू. तू कायमचाच येऊ नको अशी धमकी दिली. यानंतर मात्र बाळू कदम कामावर परतले.

चालक बाळू कदम यांना बळजबरीने आष्टी-पुणे या बस (क्रमांक MH 20 BL 2086) वर पाठवले. बाळू आपल्याला मिळालेली बस घेऊन दुपारी अडीच वाजता पुण्याच्या दिशेने निघाले होते. परंतु, याच दिवशी 3 वाजेच्या सुमारास त्यांनी कडा बसस्थानकावर ही बस थांबविली. यावेळी वाहक नामदेव राजाभाऊ साळवे हे बसची नोंद करण्यासाठी कडा वाहतूक नियत्रंण कक्षात गेले. तेव्हाच चालक बाळू बसस्थानकाच्या बाहेर असलेल्या कृषी दुकानात गेले. येथून किटक नाशकाची बाटली विकत घेतली.

हेच किटकनाशक घेऊन बाळू यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
हेच किटकनाशक घेऊन बाळू यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

बाळू यांनी वाहक साळवे यांना मी आता किटकनाशक घेत असल्याचे सांगीतले. कडा आष्टी रोडवरील नदीच्या कडेला औषध घेण्यासाठी कदम निघालेही. तोपर्यंत साळवे आणि विभाग नियत्रक आयशा शेख यांनी पळत जाऊन त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. पण, तोपर्यंत बाळू कदम यांनी विष घेतले होते. बाळू कदम यांना कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यांनतर त्यांना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. कदम यांची प्रकृती चिंताजनक आहे असे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास मोराळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...