आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:फकीर जवळा येथे विवाहितेची आत्महत्या, सासरच्या मंडळींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाचास कंटाळून मंगळवारी दुपारी महिलेने विष प्राशन केले होते.

तालुक्यातील फकीर जवळा येथील एका विवाहितेने सासरच्या जास्त जाचास कंटाळून मंगळवार दि .18 रोजी विष प्राशन केले होते . सदर विवाहितेस अंबाजोगाई येथे उपचारार्थ दाखल केले असता मंगळवारी रात्री तिचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील जवळा येथील सदाशिव चव्हाण यांच्या अनिता या मुलीचा विवाह गावातीलच बालासाहेब मोरे या युवकासोबत 6 वर्षांपूर्वी झाला होता. विवाहापासून सासरच्या मंडळीकडून सतत पैशासाठी अनिताला सासरची मंडळी शिवीगाळ करत मारहाण करायची. या जाचास कंटाळून मंगळवारी दुपारी महिलेने विष प्राशन केले.

अत्यवस्थ अवस्थेत अनिताला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात सासरच्या मंडळीने दाखल केले. मंगळवारी रात्री दहा वाजे दरम्यान तिचा मृत्यू झाला. बुधवार दिनांक 19 रोजी अनिताचे शवविच्छेदन केल्यानंतर फकीर जवळा येथील स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान अनिताची आई शारदा सदाशिव चव्हाण यांच्या फिर्यादी वरुन पती बालासाहेब शंकर मोरे ,सासु कोंडाबाई शंकर मोरे व दिर रवी शंकर मोरे यांच्यावर शिरसाळा पोलिसांत आत्महत्यास कारणीभुत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरसाळा पोलिस स्टेशनचे सपोनी एकशिंगे पुढील तपास करत आहेत

बातम्या आणखी आहेत...