आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी:नदीचा पूल वाहून गेल्याने वडिलांना लेकीचा मृतदेह घेऊन जावा लागला खांद्यावर, बीडमधील मन सुन्न करणारी घटना

प्रतिनिधी | बीड2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई तालुक्यातील भोजगाव येथे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षाच्या तरूणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. मुलीचा मृतदेह उमापूर येथील रूग्णालयात नेताना वाटेत गावाजवळील नदीवरील पूल वाहून गेल्याने पित्याला सुरूवातीला बैलगाडी व नंतर पाण्यातून बैलागाडीही पुढे जात नसल्याने चक्क नदी ओलांडण्यासाठी लेकीचा मृतदेह स्वत:च्या खांद्यावर घेवून जाण्याची वेळ आली.

गेवराई तालुक्यातील भोजगाव येथील निकिता दिनकर संत या महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन राहत्या घरी शुक्रवारी दुपारी आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्तेनंतर निकिता संत हिचा मृतदेह गेवराई तालुक्यातील उमापूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात येत होता. भोजगाव परिसरातून वाहणाऱ्या अमृता नदीवरील पूल पुरात वाहून गेल्याने सुरुवातीला लेकीचा मृतदेह बैलगाडीतून नेण्यात आला. मात्र पुढे नदीच्या पाण्यामुळे बैलगाडी देखील जात नसल्याने चक्क नदी ओलांडण्यासाठी वडील दिनकर संत यांना आपल्या मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जावा लागला आहे.

गेवराईच्या चोरपूरी येथील रस्त्याने महिलेचा बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच या भोजगावच्या संतापजनक घटनेमुळे गेवराई तालुक्यातील लोकप्रतिनिधी काय करतात असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...