आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड जिल्ह्यातून गतवर्षी युरोपियन देशात २३ टन द्राक्षे व इंग्लंड तसेच अफगाणिस्तानात ३०० टन भेंडीची निर्यात केली होती. आता यंदाही फळांसह वांगी, टोमॅटो व भाजीपाला परदेशात पाठवण्याची संधी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे. भाजीपाला व फळांच्या निर्यातीसाठी शेतकऱ्यांना आता कीडनाशक उर्वरित अंश तपासणीबाबतचे प्रमाणपत्र मिळवून उत्पादनाचा दर्जा राखल्यास निर्यात करता येणार आहे.
जागतिकसह स्थानिक बाजारपेठेतील ग्राहकांत आरोग्याच्या सुरक्षिततेबाबत विशेषत: कीडनाशक उर्वरित अंशाबाबत जागरूकता निर्माण झालेली आहे. कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे आरोग्याच्या सुरक्षिततेबाबत सुरक्षित
अन्न पिकवण्याची गरज आहे. तसेच स्थानिक बाजारपेठेतील ग्राहकांना कीटकनाशक उर्वरित अंशाची हमी देण्यासाठी “भारतीय अन्न सुरक्षा मानक’ प्राधिकरणाने अधिकतम उर्वरित अंश मर्यादा निर्धारित केलेली आहे. कीडनाशक अंशमुक्त फळे भाजीपाला उत्पादनांना परदेशात व स्थानिक बाजारपेठेतदेखील मोठी मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनांना देशपातळीवर तसेच परदेशातदेखील ओळख निर्माण होऊ शकते. तसेच जादाचे दर मिळून उत्पन्नात वाढ होऊ शकते.
बाबासाहेब जेजूरकर म्हणाले, कीडनाशक अंशमुक्त फळे व भाजीपाला स्थानिक बाजारपेठेत पाठवण्यासह निर्यात करण्यासाठी संबंधित उत्पादनांची नोंदणी करणे आवश्यक असते. त्याकरिता राज्यात अपेडाच्या मार्गदर्शनाखाली द्राक्षाकरिता ग्रेपनेट, आंब्याकरिता मँगोनेट, डाळिंबाकरिता अनारनेट, भाजीपाला पिकाकरिता व्हेजनेट, संत्रा, मोंसबी, लिंबाकरिता सिट्रसनेट, कांदाकरिता ओनियननेट, बोर व केळी या फळ पिकांचे ऑदरफ्रूटनेट या सुविधा उपलब्ध आहेत. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना सप्टेंबर
२०२२ पासून कीड व रोगाच्या नियंत्रणासाठी लेबल क्लेम औषधाच्या वापराबाबत, त्याचे रेकॉर्ड ठेवणे, कीडरोगमुक्त क्षेत्र इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
विविध जिल्ह्यांमधून निर्यात हाेणारी उत्पादने नाशिक : कांदा, द्राक्ष सातारा : वाटाणा, बीड - भेंडी पुणे : कांदा, वाटाणा, द्राक्ष ठाणे : पावटा आणि भाजीपाला पालघर : भाजीपाला साेलापूर, नगर : कांदा, भाजीपाला
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.