आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:बीडकरांना दिलासा, 15 मेट्रिक टन ऑक्सिजन दाखल; रुग्ण संख्येनुसार सर्वत्र होणार ऑक्सिजन पुरवठा

बीड ​​​​​​​25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्ह्यासाठी 15 मेट्रिक टन आॅक्सिजन उपलब्ध झाला असून तो टँकमध्ये उतरवला गेला.
  • आमदार संदीप क्षीरसागर यांचा पुढाकार

जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमधील रुग्णांचे प्राण कंठाशी आले होते. दरम्यान, बुधवारी काहीसा दिलासा बीडकरांना मिळाला. आमदार संदीप क्षीरसागरांच्या पाठपुराव्यानंतर १५ मेट्रिक टन ऑक्सिजन बीडला बुधवारी दुपारी दाखल झाला. मागील काही दिवसांत काेरोनाबाधित रुग्णांमध्ये शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे रुग्णांसाठीच्या आॅक्सिजनची मागणी गेल्या काही दिवसांत वाढली आहे. जिल्हा रुग्णालय, लोखंडी सावरगाव रुग्णालय व स्वाराती रुग्णालयातील ऑक्सिजन निर्मिती प्लँट कार्यान्वित आहेत मात्र त्यांची क्षमता कमी आहे.

प्रत्येक प्लँटमधून दिवसासाठी ८४ जम्बो सिलिंडर ऑक्सिजन निर्मिती होऊ शकते. मात्र, जिल्ह्याला रोज साडेतीन हजार जम्बो सिलिंडर म्हणजे सव्वादोन कोटी लिटर ऑक्सिजनची आवश्यकता आहे. यासाठी बीडमध्ये एक, लोखंडी सावरगावात एक, तर स्वारातीमध्ये दोन १० केएल क्षमतेचे लिक्विड ऑक्सिजन टँक बसवलेले आहेत, मात्र यासाठीचा लिक्विड ऑक्सिजन पुण्याच्या कंपनीकडून येतो. तिथेही तुटवडा असल्याने मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा होता. रुग्णालयातील प्लँट, स्थानिक पुरवठादार यांच्या मदतीने काटकसरीने वापर केला जात होता. दरम्यान, आमदार क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्याला २२ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा तातडीने करावा, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी बोलून मागणी केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री मुंडे, अन्न व अाैषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या सूचनेनुसार बीडला १५ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे.

१० केएल ऑक्सिजन
जिल्ह्याला १५ मेट्रिक टन ऑक्सिजन मिळाला. यातील १० केएल ऑक्सिजन अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयाला दिला जाणार आहे, बीड व लोखंडी सावरगावतही आॅक्सिजन दिला जात आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनअभावी कुणाचाही जीव धोक्यात येऊ नये, यासाठी काळजी घेतली जात आहे. अजित कुंभार, सीईओ, जि. प. बीड.

आवश्यकता पाहून वाटप
जिल्ह्यात जे लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे त्याचे वाटप रुग्ण संख्येनुसार आणि गरजेनुसार आवश्यक आहे. यासाठी स्वतः लक्ष देणार असल्याचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे.


बातम्या आणखी आहेत...