आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:पोलिस अधीक्षक पोद्दार यांच्याकडून छळ, अपानास्पद वागणूक दिल्याचा पोलिस निरीक्षकाचा आरोप; जिल्हा पोलिस दलात खळबळ

बीड2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिस निरीक्षकाने मागितली स्वेच्छा निवृत्ती, बरे वाईट झाल्यास एसपी जबाबदार, महासंचालकांना पाठवले पत्र

जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या विरोधात पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगुलवार यांनी थेट पोलिस महासंचालकांकडे तक्रार केली आहे. पोलिस अधीक्षकांकडून सतत मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे माझे स्वास्थ खराब होत आहे, काम करण्याची इच्छा असूनही पोलिस अधीक्षकांच्या वागणुकीमुळे काम करता येत नसल्याचा कथित आरोप पेरगुलवार यांनी केला. यामुळे स्वेच्छा निवृत्ती द्यावी अशी मागणी पेरगुलवार यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार
पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार

पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या विरोधात पीआय पेरगुलवार यांनी थेट पोलिस महासंचालकांचे दार ठोठावले आहे. दोन पानी पत्रामध्ये पेरगुलवार यांनी आपला पोलिस अधीक्षकांकडून कशा प्रकारे छळ केला गेला याबाबत माहिती दिली आहे. 24 जुलै 2019 रोजी अंबाजोगाईत झालेल्या क्राइम मिटिंगमध्ये किरकोळ कारणांवरुन तुम्हाला डोके नाही, तुम्ही परीक्षा कशी पास झालात असे म्हणून अपमान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. परळी दौऱ्यातील बंदोबस्तादरम्यानही अपमानास्पद वागणूक दिली. तर, 27 जून रोजी फोनवरुन अर्वाच्च भाषेत बोलून अपमान केला. 2 जुलै रोजीही असाच प्रकार केल गेला शिवाय, आपली पिस्टलही जमा केली गेली असून सततच्या छळामुळे माझे स्वास्थ बिघडले आहे, आजारी रजेवर गेल्यावर त्या काळातील वेतनही केले गेलेले नाही. पोलिस अधीक्षकांकडून होणाऱ्या छळामुळे मी त्रस्त असल्याचे पेरगुलवार यांनी म्हटले आहे. 

पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगुलवार यांनी पोलिस महासंचालकांकडे पाठवलेले दोन पानी तक्रार पत्र
पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगुलवार यांनी पोलिस महासंचालकांकडे पाठवलेले दोन पानी तक्रार पत्र

तुला जोड्याने मारतो, पेरगुलवार मतिमंद असे शब्दप्रयोग

तक्रारीनुसार, पीआय पेरगुलवार यांनी पोलिस अधीक्षकांनी आपल्याला तुला जोड्याने मारतो, मतिमंद पीआय पेरगुलवारला नियंत्रण कक्षात हजर करा असे आदेश नियंत्रण कक्षाला दिले याबाबतही आपण नियंत्रण कक्ष डायरीला नोंद केल्याचे पेरगुलवार म्हणाले

बरे वाईट झाल्यास एसपी जबाबदार

एसपींकडून होणाऱ्या छळामुळे मला स्वेच्छा निवृत्ती द्यावी अशी मागणी मी केली आहे. माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास त्याला सर्वस्वी पोलिस अधीक्षक जबाबदार राहितील. त्यांच्या छळामुळे माझ्या कुटुंबावर, मुलांवरही परिणाम होत आहे. मी याबाबत महासंचालकांशी पत्र व्यवहार केला आहे. - रविंद्र पेरगुलवार, पोलिस निरीक्षक, बीड

पेरगुलवार यांचा कामात निष्काळजीपणा

पीआय पेरगुलवार यांनी तक्रार केली असल्याबाबतीत माहिती आहे.त्यांच्या कामात ते निष्काळजीपणा करतात योग्य कारवाई वेळोवेळी केली गेली असल्याची प्रतिक्रिया  पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली आहे. 

बातम्या आणखी आहेत...