आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर पार पडलेल्या योगेश पर्व प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेतील अंतिम सामन्यात बाजी मारत बीड पोलीस संघाने चषक पटकावला. बीड येथील बिलाल भैया मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या योगेश पर्व प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेला बीडकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. या स्पर्धेची अंतिम लढत बीड पोलीस आणि एडीएफसी संघात झाली. एडीएफसी संघाने प्रथम फलंदाजी करत १८.३ षटकात ११५ धावा काढल्या. ११६ धावांचे माफक आव्हान बीड पोलीस संघाने अवघ्या ८.५ षटकात एक ही गडी न गमावता पूर्ण केले. बीड पोलीस संघाचे सलामीवीर धर्मेश आणि ऋषिकेश या जोडीने प्रत्येकी ५७ धावा काढल्या. १३ दिवस चाललेल्या या स्पर्धेत एकूण १० संघांनी सहभाग नोंदवला.
यात बीड पोलिस संघाने प्रथम तर एडीएफसी संघाने द्वितीय पारितोषिक पटकावले. डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते विजेत्या संघाला दीड लाख रुपये व स्मृतिचिन्ह आणि उपविजेत्या संघाला ७५ हजार रुपये रक्कम व स्मृतिचिन्ह देण्यात आले. स्पर्धेचे प्रथम पारितोषिक माजी नगरसेवक शुभम धूत यांनी तर द्वितीय पारितोषिक मुश्ताक शेख यांच्या वतीने देण्यात आले.
या स्पर्धेतील अमोल ससाणे सामनावीर, समीर काटकर मालिकावीर, समीर काटकर सर्वोत्कृष्ट फलंदाज, इलियास पटेल सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि ओमकार काळे सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक ठरले तर स्पर्धेतील डीसीप्लिन संघ म्हणून ए. एम. चॅलेंजरची निवड करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.