आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजा मुंडेंचे समर्थक आक्रमक:बीड दौऱ्यावर असणाऱ्या प्रवीण दरेकरांचा ताफा अडवला, पंकजांला डावलल्यामुळे समर्थक नाराज

बीड22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपने राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेतही पंकजा मुंडे यांना डावलल्यानंतर पंकजा मुंडे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा ताफा बीड-उस्मानाबाद सीमेवर अडवण्यात आला. पंकजा मुंडे समर्थकांनी हा ताफा अडवला होता.

पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रवीण दरेकर यांच्या ताफ्याला पारगाव येथे अडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पंकजा मुंडे समर्थक सध्या भाजपवर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यसभेनंतर भाजपकडून विधान परिषदेतही पंकजा मुंडेंना डावलल्यानंतर बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात समर्थकांच्या मनात नाराजी पाहायला मिळत आहे.

औरंगाबादमध्येही आंदोलन

काही दिवसांपुर्वीच औरंगाबादमध्येही समर्थकांनी भाजप विरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर आज दरेकर हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांचा ताफा मुंडे समर्थकांकडून अडवण्यात आला. दरेकर गाडीतून बाहेर निघताच पंकजा मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केल्या. घटनास्थळी पोलिस दाखल झाल्याने कार्यकर्ते मात्र तिथून निघून गेले.

20 जूनला निवडणूक

दरम्यान, राज्यात विधान परिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 20 जूनला निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपने आपले पाच उमेदवारांची घोषणा केली असून, यात मात्र पंकजा मुंडे यांना डावलण्यात आले आहे. भाजपकडून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, राम शिंदे आणि श्रीकांत भारतीय या पाच जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...