आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:विनयभंगाचा गुन्हा नोंद; महाराजांचा आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

बीडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तीन दिवसांपूर्वी विनयभंगाचा गुन्हा नोंद झालेले कोळगाव (ता. गेवराई) येथील सूर्यमंदिर संस्थानचे मठाधिपती हनुमान महाराज यांनी रविवारी दुपारी समाजमाध्यमांत व्हिडिओ अपलोड करून आत्महत्या करत असल्याचे सांगितले. यामुळे खळबळ उडाली. रात्री ८ वाजेपर्यंत पोलिसांना महाराजांचा ठावठिकाणा सापडलेला नव्हता. ३० व ३१ जानेवारी रोजी मंदिर परिसरातील एका कुटुंबाच्या घरी हनुमान महाराज गेले होते. या कुटुंबातील १५ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप महाराजांवर होता.

४ फेब्रुवारी रोजी त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला. दरम्यान, महाराज तेव्हापासून फरार होते. रविवारी दुपारी त्यांनी व्हिडिओ जारी केला. माझ्याविरोधात कट रचला गेला. खोटा आरोप केला गेला. मी निर्दोष आहे. मला मारहाण करून, व्हिडिओ करून ५ लाखांची मागणी केली. पैसे न दिल्याने गुन्हा नोंदवला गेला. मला जगायची इच्छा नाही, मी गळफास घेऊन आत्महत्या करत आहे, असे या व्हिडिओमध्ये महाराजांनी म्हटले आहे. दरम्यान, व्हिडिओनंतर पोलिसांची धावपळ उडाली. रात्री ८ पर्यंत महाराजांचा ठावठिकाणा लागलेला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...