आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमीनीच्या वादातून गोळीबार:बीडच्या रेजिस्ट्री कार्यालयात गोळीबार, 2 जण जखमी; जमीनीच्या वादातून झाले 4 राउंड फायर, आरोपी पसार

बीड6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फारुक सिद्दीकी आणि सतिश क्षीरसागर अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. - Divya Marathi
फारुक सिद्दीकी आणि सतिश क्षीरसागर अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत.

बीडच्या रेजिस्ट्री कार्यालयात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या या कार्यालयामध्ये सकाळी अचानक गोळीबार झाला. यामध्ये दोन जण जखमी झाले असून त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, जमीनीच्या वादातून हा गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये 4 राउंड फायर करण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली. सतिश क्षीरसागर आणि फारुक सिद्दीकी अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. तर फायरिंग करणारा आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.

दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच यानंतर शासकीय रुग्णालयात जाऊन जखमींची विचारणा केली. जोपर्यंत जखमी आपला जबाब नोंदवत नाही, तोपर्यंत आरोपी किंवा घटनेबाबत सविस्तर माहिती देता येणार नाही असे पोलिसांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...